बीड: चांगल्या माणसाच्या वाट्याला संघर्ष येतोच. आमदार खासदार हे पद येत असतं आणि जात असतं. पण मुंडे साहेबांची लेक हे पद आयुष्यभर राहणार आहे, असं वक्तव्य भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केले आहे. याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या, चांगल्या माणसांच्या वाटेला संघर्ष येतो. जिथे श्रीराम आणि सीता सुटले नाहीत, तिथे आम्ही कसे सुटणार? असं वक्तव्य भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केले आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे त्या बोलत होत्या. त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. ग्रामस्थांच्या वतीने जेसीबीने प्रीतम मुंडे यांचे पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत करण्यात आले. याच कार्यक्रमाला संबोधित करताना प्रीतम मुंडे भावनिक देखील झाल्याचे पहायला मिळाले. सध्या एकीकडे महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील राजकारणात अनेक पैलू महाराष्ट्र पाहत आहे. श्रेयवाद त्याचबरोबर सभा ही गाजत आहे. मात्र या सगळ्या पलीकडे आपल्याजवळ असलेले पद ते म्हणजे खासदारकी आणि या पदासोबत जे काम सध्या करायचे आहे, त्या कामाच्या निमित्त सध्या खासदार प्रीतम मुंडे या बीड जिल्ह्यातील अनेक विकास कामांसाठी दौरा करत आहे.यात अनेक विकास कामांचे उद्घाटन देखील आत्तापर्यंत प्रीतम मुंडे यांनी केले आहे. मात्र या विकास कामाच्या वेळी सध्या तरी प्रीतम मुंडे राजकीय भाष्य करण्यास टाळत आहेत. त्याचबरोबर तब्बल दोन महिने पंकजा मुंडे यांनी देखील राजकारणात टीका करण्यापासून दूर राहिल्या आहेत. आता त्या देखील एका यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे. मात्र बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांनी भेट दिली. तब्बल खासदार होऊन नऊ वर्षानंतर या गावात आले, याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. मात्र या गावातील कोणताही प्रश्न आता मागे राहणार नाही, असं वक्तव्य करत गावकऱ्यांचं त्यांनी मन जिंकले. मात्र यावेळेस तेथील माणसांशी संवाद साधताना त्या भावनिक झाल्या. या भावनिकतेमध्ये त्यांनी असंही म्हटलं की, अनेक पद येतात आणि जातात. मात्र मुंडे साहेबांची मी लेक हे पद आयुष्यभर राहणार आहे. मी मुंडे साहेबांची बरोबरी नाही करू शकत. मात्र त्यांनी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या ज्या लोकांनी मला न पाहता ही दोन वेळेस निवडून दिले. त्या लोकांसाठी आता माझं कर्तव्य आहे, काहीतरी करण्याचे. जिल्हाभरात विकास कामांचे उद्घाटन करत सध्या प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यातील तालुका गाव वाडी वस्ती या ठिकाणी जात लोकांची मन जिंकली असल्याचा स्वरूप या स्वागताने तरी पाहायला मिळत आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात अनेक जीसीपी लावत पुष्पवृष्टी करत प्रीतम मुंडेंचं स्वागत या गावकऱ्यांनी केलं. मात्र या प्रत्येक कार्यक्रमात प्रीतम मुंडेंची क्रेझ सध्या जनमानसात मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. सध्या जिल्ह्यातलं राजकारण कोणत्याही स्थितीला जरी असलं तरी प्रीतम मुंडेंनी जनमानसात स्वतःचं अस्तित्व हे चांगल्या पद्धतीने टिकवून त्यांच्या मनात अधिराज्य करत असल्याचं यावेळेस पाहायला मिळत आहे. या सगळ्या स्वागताला पाहून आणि त्याच वेळेस त्या गावातील जनतेला पाहून खासदार प्रीतम मुंडे अखंड हरिनाम सप्ताह भेट देताना आणि या सप्ताहात संबोधित करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. आज पंकजाताई कुठल्याच मंत्रिपदावर नाहीत, आमदार खासदार हे पद येत जाते. पण मुंडे साहेबांची लेक हे आयुष्यभर पद राहणार आहे, असं म्हणत त्या जनतेसमोर भावनिक झाल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZaATSrG
No comments:
Post a Comment