Breaking

Tuesday, August 1, 2023

Thane News: आयुक्तालय क्षेत्रातून होणाऱ्या वाहतुकीत बदल, वाहनांना 'या' वेळेत बंदी; कारण... https://ift.tt/OeHD2Tu

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून दिवसा होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर अखेर बंदी घालण्यात आली. ठाणे वाहतूक शाखेने मंगळवारी याबाबत अधिसूचना जारी करत वाहतूक बदल लागू केले आहेत. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांना ही बंदी लागू केली जाणार असून या काळात अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेत अवजड वाहनांच्या कोंडीत अडकणाऱ्या हलक्या वाहनांना आणि पर्यायाने नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.जेएनपीटी बंदरातून निघणारी अवजड वाहने भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर, शिळफाटा, मुंब्रा बायपास आणि मुंबई-नाशिक महामार्गाचा वापर करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ऐन पावसाळ्यात या महामार्गाची पुरती दुरवस्था होते. महामार्गावर खड्डे पडल्याने येथील अवजड वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत रांगा लागून दहा मिनिटांच्या प्रवासासाठी दोन तास लागत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर वाढता जनक्षोभ आणि राजकीय रेट्यानंतर अवजड वाहनांना दिवसा शहरातून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच अवजड वाहनांना शहरातून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली असून पुढील ३० दिवस अथवा खारेगाव टोलनाका ते पडघा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांवरील बंदी कायम राहणार असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे.पुढे रस्ता बंद आहे...जेएनपीटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे मुंबई-नाशिक महामार्ग आणि गुजरातकडे जाण्यासाठी शिळफाटा येथे दिवसा बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकडून मुलुंड आनंदनगर टोलनाकामार्गे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना याठिकाणी बंदी आहे. यासोबतच नाशिककडून येणाऱ्या अशा वाहनांना शहापूर येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांना शहापूर येथून राष्ट्रीय महामार्ग तीनवरून डावे वळण घेत सापगाव-मुरबाड-कर्जत-चौक फाटा या मार्गे जेएनपीटीकडे जाण्याचा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर (टेन नाका) येथे बंदी घालण्यात आली आहे. त्यांना पोशेरी-वाडा नाका-कांब्रे, दहागावमार्गे वाशिंदकडून नाशिकला मार्गस्थ होता येणार आहे.रस्ते गेले वाहूनमहामार्गांच्या दुरुस्तीसाठी विविध यंत्रणांकडून विशेष ब्लॉक घेत पावसाळ्याआधी कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र पावसाच्या काही सरींमध्ये रस्त्यांची पूर्ण चाळण होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची वेळ वाहतूक विभागावर येते. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. आता या बंदीनंतर किमान काही दिवस हलक्या वाहनांची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OjR04Bc

No comments:

Post a Comment