Breaking

Friday, September 29, 2023

भारत-इंग्लंडचा वर्ल्ड कपमधला सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ... https://ift.tt/9Rs80rp

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना शनिवारी ३० सप्टेंबरला गुवाहाटी येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर भारताचा सामना आता इंग्लंडबरोबर होणार आगे. पण हा सामना नेमका किती वाजता सुरु होणार, याची योग्य वेळ आता समोर आली आहे.हा सामना सुरु करण्यासाठी पंच मैदानात दुपारी १२.३० च्या दरम्यान उतरतील. जर पावसाचे वातावरण असेल तर नेमका काय निर्णय घ्यायचा, याची चर्चा पंत करतील. पाऊस पडलेला असेल तर मैदान कधी सुकणार आणि सामना कधी सुरु करायचा हा निर्णय पंचांना घ्यावा लागेल. पण जर पाऊस पडला नाही तर दुपारी १.३० वाजता या सामन्याचा टॉस होईल. यावेळी दोन्ही कर्णधार आपला ११ सदस्यांचा संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू काही काळ मैदानात सराव करतील. टॉस झाल्यावर अर्ध्या तासाने हा सामना सुरु केला जाणार आहे, म्हणजेच हा सामान दुपारी २.०० वाजता सुरु करण्यात येईल. भारत आणि इंग्लंड यांच्याातील वर्ल्ड कपच्या या सामन्यात मोठे बदल होणार आहेत. कारण यापूर्वी भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला होता. त्यामुळे आता वर्ल्ड कपपूर्वीचा हा सामना जिंकण्यासाठी भारताचा संघ आतूर असेल. वर्ल्ड कपपूर्वी भारतासाठी हा सामान महत्वाचा असेल, कारण या सामन्यात भारताला वर्ल्ड कपसाठी चांगला फायदा होऊ शकतो. कारण भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात भारताला आपले कच्चे दुवे ठीक करता येतील आणि वर्ल्ड कपपूर्वी ही गोष्ट त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची ठरेल. त्यासाठी हा सराव सामना भारतासाठी महत्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, सूर्यकुमार यादव. इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स .


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TQyU1o3

No comments:

Post a Comment