Breaking

Friday, September 29, 2023

गुड न्यूज! वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली, जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर https://ift.tt/rZoCO84

म. टा. प्रतिनिधी, पुणे: खडकवासला साखळी प्रकल्पातील धरण क्षेत्रात दिवसभरात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुण्याच्या वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता सध्या मिटल्याचे चित्र आहे. पानशेत, वरसगाव धरण फुल्ल झाले आहे. खडकवासलाही फुल्ल होण्याची शक्यता आहे.खडकवासला धरण क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहेॉ. गणरायाच्या आगमनासोबत पावसाने शहरात पुनरागमन केले. धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. पाणीसाठा आतापर्यंत केवळ ९६.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच २८.२३ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.खडकवासला धरण हे ९६ टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे धरण पातळीमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, खडकवासला धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत २३ मिलीमीटर, पानशेतमध्ये ३४ आणि वरसगावमध्ये ३३ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तर टेमघर धरणात ४० मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८.२३ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी प्रकल्पांत ९९.८८ टक्के म्हणजेच २९.१२ टीएमसी पाणी जमा झाले होते.भीमा खोऱ्यात १४८ टीएमसीभीमा खोऱ्यातील एकूण धरणांमध्ये १४८.७६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत हा पाणीसाठी ७५ टक्के आहे. मुळशीतील टाटा धरणांमध्ये ४१.१९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. त्या ठिकाणची धरणेही लवकरच फुल्ल होण्याची शक्यता असून त्यांचे प्रमाण ९६.३२ टक्के आहे. उजनी धरणात पाणीसाठा वाढला असून १५.४० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.जिल्ह्यातील धरणे फुल्लभीमा खोऱ्यातील पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना तसेच जिल्ह्यातील कासारसाई, कलमोडी, चासकमान, भामाआसखेड, आंद्रा, तडिवळे, वडज, डिंभे ही धरणे फुल्ल झाल्याची नोंद जलसपंदा विभागाने केली.धरणक्षेत्रातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण पाणीसाठा टक्केखडकवासला १.८६ ९६पानशेत १०.६५ १००वरसगाव १२.८२ १००टेमघर २.९१ ७८.३९खडकवासला प्रकल्पातील एकूणसाठा २८.२३ ९६.८५ भामा आसखेड ७.६७ १००पवना ८.५१ १००


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/D6EtiCf

No comments:

Post a Comment