![](https://maharashtratimes.com/photo/103850156/photo-103850156.jpg)
मुंबई : देशातील शाही थाटातील अलिशान रेल्वे अशी ख्याती असलेल्या ‘ २.०’ची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गुरुवारी चाचणी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान ओडिसीची चाचणी पार पडली असून, कोकणातील पर्यटनासह दिल्ली आणि देशातील अन्य पर्यटन मार्गावर ही अलिशान रेल्वे धावणार आहे.सन २००४मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते डेक्कन ओडिसीचे उद्घाटन करण्यात आले होते. करोनाकाळात बंद झाल्यानंतर आता पुन्हा ओडिसी पर्यटकांच्या सेवेत उपलब्ध झाली होती. …‘सीएसएमटी-नाशिक-छत्रपती संभाजीनगर-कोल्हापूर -मडगाव-सावंतवाडी’ या मार्गावर लवकरच डेक्कन ओडिसी धावणार आहे. तसेच मुंबई-उदयपूर-जोधपूर-जयपूर-आग्रा-नवी दिल्ली या मार्गासह ज्योर्तिलिंग, जागतिक वारसा स्थळ, सांस्कृतिक स्थळे, वन्यजीव ठिकाणी येथे देखील अलिशान गाडीतून सहलीचे नियोजन आहे.‘देशातील प्रसिद्ध-अलिशान गाडीपैकी एक अशी ओळख डेक्कन ओडिसीची आहे. यामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल. परदेशी पर्यटकांमध्ये गाडीला विशेष पसंती आहे. नव्या रूपात डेक्कन ओडिसी रेल्वेगाडीचा पर्यटकांनी आनंद घ्यावा’, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. ‘या गाडीचे मार्ग, वेळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ, शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. याप्रसंगी पर्यटनमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.अशी असेल गाडी- २१ डब्यांची गाडी- १० रेल्वे डब्यांमध्ये प्रत्येकी चार डिलक्स केबिन- दोन रेल्वे डब्यांमध्ये दोन प्रेसेडेन्शिअल सूट्स- नऊ डब्यांपैकी एक डबा परिषद गृह, दोन डबे भोजन कक्ष, एक डबा हेल्थ स्पा, एक डबा बार, दोन डबे कर्मचारी वर्ग व उर्वरित दोन डबे जनरेटर आणि व भांडारगृह
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YoIREqf
No comments:
Post a Comment