Breaking

Thursday, September 21, 2023

Weather forecast: पावसाची नवी तारीख, 'या' महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज https://ift.tt/VpejsCJ

मुंबई : सप्टेंबरचे तीन आठवडे उलटून गेले असून, राज्यात पावसाची एकूण तूट ९ टक्के आहे. पैकी मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के तूट आहे. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा आणि पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरचा पहिला आठवडा या काळात राज्यभरात सर्वदूर पाऊस असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवला.यानुसार, २८ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या आठवड्यात मध्य भारतात सरासरीहून अधिक पाऊस असेल. त्यानंतरही २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीतही मध्य भारतात सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे. या काळात संपूर्ण राज्यभरातही सर्वदूर पाऊस असेल, असे सध्याच्या ‘मॉडेल’वरून दिसत आहे. त्यानंतर ५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे; तसेच १२ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत कोकण विभाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मान्सूनचा आस सरासरीच्या जागेपासून दक्षिणेला असून, पश्चिम बंगालच्या उपसागरात साडे सात किलोमीटर उंचीचे कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. मुंबईसह कोकण विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचाही अंदाज त्यांनी वर्तवला.२४ ते २६ सप्टेंबरदरम्यान राज्यातील मुंबईसह संपूर्ण कोकण व नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता जाणवते, असेही त्यांनी स्पष्ट केले. २५ सप्टेंबरपर्यंतच्या अंदाजुसार, आज, २२ ते २४ सप्टेंबर हे चार दिवस उत्तर आणि दक्षिण कोकणात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9uxYLty

No comments:

Post a Comment