Breaking

Saturday, September 30, 2023

मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीला स्थगिती, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश https://ift.tt/O6Yw1nA

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी ३८९ झाडे, मलबार टेकडी, परिसरातील रस्ते बाधित होत आहेत. त्यास येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. जलाशयासाठी नवीन पर्याय सुचवण्यासाठी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत या कामाला स्थगिती देण्याचे निर्देश यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.मुंबईतील ब्रिटिशकालीन जलाशयांपैकी एक असलेल्या १३५ वर्षे जुन्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या पुनर्बांधणीमुळे सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे. सुमारे ६९५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या जलाशयाच्या बांधकामादरम्यान १८९ झाडे कापली जाणार असून २०० झाडांचे फिरोजशाह मेहता उद्यानात (हँगिंग गार्डन) पुनर्रोपण पालिकेने प्रस्तावित केले आहे. त्यास येथील रहिवाशांकडून विरोध करण्यात आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री लोढा यांनी नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या. मात्र त्यातून तोडगा निघालेला नाही. जलाशयाच्या पुनर्बांधणीला रहिवाशांनी विरोध करत पालिकेने हा जलाशय पर्यायी जागेत हलवावा, अशी मागणी केली आहे.या कामामुळे मलबार नैसर्गिक टेकडी, झाडे आणि रस्ता बाधित होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, झाडे व इतर पर्यावरणीय बाबींना धक्का न लावता पर्यायी मार्गाने काम करण्याची मागणी केली आहे. या विषयावर सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता पर्याय सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.‘अहवाल येईपर्यंत थांबा’समितीचा अहवाल येईपर्यंत नवीन जलाशयासाठी सध्या सुरू असलेली सर्व कामे स्थगित करण्यात यावीत, झाडांवर लावण्यात टॅग काढून टाकावेत. प्रस्तावित जागेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेली बेदखल नोटीस मागे घेण्यात यावी, प्रस्तावाबाबतचे सर्व संबंधित अहवाल आणि विश्लेषण पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, पालिकेने जलाशयासाठी पर्यायी जागा शोधावी तसेच जनभावनेतून उपस्थित झालेला पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने अहवालाच्या आधारे पुढील योग्य निर्णय होईपर्यंत सहकार्य करावे, असे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या पत्रात म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lv7eWqg

No comments:

Post a Comment