Breaking

Thursday, September 28, 2023

मोदींनी उल्लेख करताच विरोधक अलर्ट, काँग्रेसचं दुसऱ्याच दिवशी अभियान सुरु,मध्यप्रदेशात डाव पलटणार? https://ift.tt/txVcTeJ

भोपाळ: २०१८ च्या निवडणुकीत सत्ता मिळवून देखील धक्का बसलेली काँग्रेस यावेळी मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी सतर्क झाली आहे.काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपच्या एक पाऊल पुढं टाकताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी ते कमलनाथ २०१८ मॉडेल होतं आता कमलनाथ मॉडेल २०२३ मॉडेल असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपासून प्रभावी रणनीती राबवण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून महिलासांठी योजनाच्या पुढं पाऊल टाकलं जात नसताना काँग्रेस पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी प्लॅन बनवत आहे. काँग्रेस युवकांवर लक्ष केंद्रीत करत आहे.नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला भाषणात पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचा उल्लेख केला लगेच दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं फर्स्ट वोटर फॉर काँग्रेस अभियान सुरु केलं. काँग्रेस आता जे युवक पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.मध्य प्रदेशातील आकेडवारीनुसार पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या १८ लाख ८६ हजार इतकी आहे. ४ ऑक्टोबरला येणाऱ्या अंतिम मतदार यादीत ही संख्या १९ लाखांवर जाऊ शकते. मध्य प्रदेशातील २३० मतदारसंघांचा विचार केला असता ८२०० मतदार प्रत्येक मतदारसंघात मतदान करतील. त्यामुळं काँग्रेसनं फर्स्ट वोट फॉर काँग्रेस हे अभियान सुरु केलं आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ८५ जागा अशा होत्या जिथं त्यांच्या विजयी उमेदवारांचं मताधिक्य ८ ते ९ हजारांच्या दरम्यान होतं. ८ जागा काँग्रेसनं १५१७ ते ५११ मतांनी गमावल्या होत्या. ३५ पेक्षा अधिक जागा ८ हजार पेक्षा कमी मताधिक्यानं काँग्रेसनं जिंकल्या होत्या. त्यामुळं कमलनाथ यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.मध्य प्रदेशात २००३ पासून भाजप सरकार आहे. २००५ पासून तिथं शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत. २०१८ ते २०२० दरम्यान कमलनाथ मुख्यंत्री होते. त्यामुळं १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या युवकांनी शिवराज सिंह चौहान यांचा कार्यकाळ पाहिला आहे.

युवकांच्या मुद्यावर शिवराजसिंह चौहान बॅकफुटवर?

मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या काळात सरकारी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्तानं ते युवकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. सध्या एका भरती प्रक्रियेत १२ लाख युवक परीक्षेला बसले होते. त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. दुसरीकडे २६ सप्टेंबरला काँग्रेसचे महासचिव आणि मध्य प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस कार्यालयात एनएसयूआयच्या फर्स्ट वोट फॉर काँग्रेस लाँच केलं. या अभियानाद्वारे एनएसयूआय युवा मतदारांपर्यंत पोहोचणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kTJrm6L

No comments:

Post a Comment