Breaking

Thursday, September 28, 2023

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत बॅनर ठरला चर्चेचा विषय; आशयावर सर्वांची नजर पडली, नेमकं काय लिहिलं? https://ift.tt/NrR7ZIi

पुणे: पुण्यात सकाळपासूनच गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ही गणेश विसर्जन मिरवणूक परिसरातील अनेक नागरिक पाहण्यासाठी येत असतात. या मिरवणुकीत वेगवेगळे संदेश देणारे बॅनर लावले जातात किंवा पुणेकर नागरिक हातात घेऊन ते उभे राहतात. या गणेश उत्सव मिरवणुकीत देखील अशाच एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. रिलस्टार पवन वाघुलकरने हातात घेतलेला बॅनर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. "ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका" या मजकुराचा बॅनर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. गेले दहा दिवसांपासून पुणेकरांनी गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केली. अजा त्याला निरोप देण्याचा दिवस होता. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांचा उत्साह देखील तेवढाच पहायला मिळाला. सकाळी १० वाजल्यापासून पुणेकर नागरिक या गणेश मिरवणुकीत सहभागी झाले होते. मानाच्या गणपतींची मिरवणूक देखील उत्साहात पार पडली. या मिरवणुकी दरम्यान पुणेरी बॅनरने लक्ष वेधून घेतले होते. हा बॅनर रिलस्टार पुण्यातील अथर्व सुदामे हा देखील गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्याच्यासोबत पवन वाघुलकर, डॅनी पंडित आणि इतर मित्रांसह मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी 'ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका' अशी पुणेरी पाटी हातात घेऊन रिल्सस्टार पवन वाघुलकरने खास पुणेरी शैलीत पुणेकरांना संदेशही दिला. पवन आणि अथर्व यांच्या पुणेरी पाटीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. दरम्यान, आता पुण्याचे मानाचे पाचही गणपतीचे विसर्जन झाले असून इतर गणपतींचे विसर्जन होत असून या पुणेरी बॅनरने मात्र सर्वांचे लक्ष वेधले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rXh90Jf

No comments:

Post a Comment