म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात दहीहंडी उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक सायंकाळी पाच ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार आहे.मध्य वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला होता. बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक ते बाबू गेनू चौक, साहित्य परिषद चौक येथे मोठी गर्दी असते. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये; म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.असा असेल वाहतूक बदल- शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने, शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे.- पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक चौक, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता येथून इच्छित स्थळी जावे.- स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने- झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.- बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक असणार आहे. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.- रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.- सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जावे.- शिवाजी रस्त्यावरून जिजामाता चौकातून गणेश रस्त्याने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक- जुनी साततोटी पोलिस चौकी अशी राहील.- गणेश रस्त्यावरील वाहतूक दारुवाला पूल येथून बंद राहील. देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दूधभट्टी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.वीर गोगादेव उत्सवानिमित्त कॅम्पात वाहतुकीत बदलकॅम्पमधील वीर गोगादेव उत्सवानिमित्त सात सप्टेंबर रोजी न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेने या ठिकाणच्या वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. दहीहंडीच्या उत्सवासाठी मध्य भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून मंडई; तसेच आसपासच्या भागांत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. स्पीकरबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. रात्री १० वाजेपर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी आहे. संभाव्य घातपाती कारवाया, दागिने आणि मोबाइल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढवण्य़ात आली आहे.- संदीपसिंह गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UZ9Rrl6
No comments:
Post a Comment