Breaking

Wednesday, September 6, 2023

Mumbai Dahi Handi: गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी, आजच्या दहीहंडीत गोविंदांना मिळणार विक्रमी मलई https://ift.tt/p67NwuM

मुंबई : निवडणुकींना काही महिनेच उरले असल्याने आता विविध राजकीय पक्षांनी मतदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी उत्सवांकडे मोर्चा वळविला असून, आज, गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीसाठी शिवसेना, भाजप, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशा सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. यंदाच्या दहीहंडीत गोविंदा पथकांना विक्रमी मलई मिळण्याची चिन्हे आहेत.यंदा मुंबईत जवळपास १७ हजार ते १८ हजार दहीहंड्या उभारल्या जाणार असल्याचे चित्र आहे. या दहीहंड्या फोडण्यासाठी केवळ मुंबईत सुमारे ९०० गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. साधारणपणे आठ थरांची दहीहंडी उभारणारे गोविंदा पथक घराबाहेर पडल्यावर गाडी, गोविंदांचे दिवसभराचे जेवण, त्यांना लागणारे टी शर्ट आणि अन्य गोष्टींचा खर्च अडीच ते तीन लाख रुपयांवर जातो. दरवर्षी हा खर्च भागविण्यासाठी गोविंदा पथकांना मदत गोळा करावी लागते. अनेकदा राजकीय नेत्यांकडे स्वतःहून जाऊन मदत मिळवावी लागते. मात्र, निवडणुका जवळ आल्याने यंदा राजकीय पक्षांनी ही संधी हेरली आहे. राजकीय पक्ष स्वतःहून गोविंदा पथकांकडे जाऊन त्यांना आर्थिक मदत देऊ करत आहेत. त्यातून पथकांची खर्चाची चिंता मिटली आहे. त्यातच यंदा गोविंदा पथकांना बक्षिसांचीही मोठी कमाई होणार आहे. अनेक मंडळांनी सहा थरांसाठी ७ हजार रुपये, सात थरांना १५ हजार रुपये, तर आठ थरांसाठी २५ ते ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. नऊ आणि दहा थर लावणाऱ्या मंडळांना काही लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती दहीहंडी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/o3GaJyF

No comments:

Post a Comment