Breaking

Wednesday, September 20, 2023

एशियन गेम्समधील भारताचे क्रिकेट सामने कुठे लाइव्ह पाहायला मिळतील, जाणून घ्या योग्य चॅनेल... https://ift.tt/xptUiqO

नवी दिल्ली : आशिया कपनंतर आता एशियन गेन्सला म्हणजेच आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भाराताच्या क्रिकेटचे सामनेही खेळवण्यात येणार आहेत. पण या स्पर्धेतील क्रिकेटचे सामने लाइव्ह कुठे पाहायला मिळू शकतात, याची माहिती आता समोर आली आहे.भारतीय संघ आता आशिया कप जिंकल्यावर आशियाई क्रीडा स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामन्यांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. भारताचा हा सामना दुपारी किंवा संध्याकाळी नाही तर पहाटे होणार आहे. भारताच्या या सामन्यासाठी मैदानाची पाहणी करण्यासाठी पंच भारतीय वेळेनुसार पहाटेल ५.३० वाजता येतील. त्यानंतर पावसाचा व्यत्यय नसेल तर सामना वेळेत सुरु केला जाईल. या सामन्याचा टॉस हा पहाटे ६.०० वाजता होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार आपली टीम जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू काही काळ मैदानात सराव करतील. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच तपहाटे ६.३० वाजता हा सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही पर्वणी गुरुवारपासून असेल. भारताचे आशियाई स्पर्धेतील हे सामने सोनी लिव्ह वेब साईट आणि अॅपवर पाहता येणार आहेत. त्याचबरोबर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवरही भारताच्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणा आहे.

आशियाई स्पर्धेसाठी निवडलेले भारताचे दोन्ही संघ पुढील प्रमाणे आहेत- :

भारतीय पुरुष क्रिकेट संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग, आकाश दीप. राखीव: यश ठाकूर, साई किशोर,व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शनभारतीय महिला क्रिकेट संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनुषा बारेड्डी.गुरुवारी भारताच्या महिला संघाचा पहिला सामना हा मलेशियाबरोबर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. त्यामुळे आशिया क्रीडा स्पर्धेत भारताचा महिला संघ विजयी सलामी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारतीय पुरुष संघाच्या सामन्यांना मात्र अजून बराच वेळ आहे. भारताचे सामेन ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7NUuhng

No comments:

Post a Comment