मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच काही जलसंपदा प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. यानंतर आता लवकरच उत्तर कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. त्यानुसार उत्तर कोकणातील नदीखोऱ्यांतून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनेद्वारे आणि उपसा नदीजोड/वळण योजनांद्वारे एकूण २२.९ टीएमसी पाणी वळविण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण १४,०४० कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.उत्तर कोकणातील नार-पार, अंबिका औरंगा, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात ३१७ टीएमसी अतिरिक्त पाणी शिल्लक आहे. पश्चिम वाहिनी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाडयात वळवण्यासाठी प्राथमिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने २०१९ रोजी समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांव्दारे तसेच उपसा नदीजोड/वळण योजनांव्दारे एकूण ८९.९२ टीएमसी पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार जवळपास ७.४ टीएमसी पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे तर, १५.५ टीएमसी पाणी हे प्रमुख उपसा वळण योजनांद्वारे असे एकूण मिळून २२.९ टीएमसी पाणी वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.यासाठी प्रवासी वळण योजनेद्वारे एकूण ३० प्रवाही वळण योजना प्रस्तावित असून यापैकी १४ वळण योजना पूर्ण झाल्या असून त्याद्वारे १.०७ टीएमसी पाणी वळविवले जात आहे व ५ बांधकामाधीन वळण योजनांद्वारे १.३५ टीएमसी पाणी वळविले जाईल. तर ११ भविष्यकालीन योजनाद्वारे ४.९८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य म्हणजे प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे जवळपास १५.५५ टीएमसी पाणी वळविण्याचे प्रस्तावित असून त्याअंतर्गत तीन प्रकल्पांवर सध्या काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सध्या काही नदीजोड प्रकल्पांवर काम सुरू आहे.दमणगांगा-वैतरणा-गोदावरीदमणगंगा-वैतरणा-गोदावरी (कडवा-देव) नदीजोड योजनेंतंर्गत दमणगंगा खोऱ्यात वाल नदीवर निलमाती, वाघ नदीवर मेट व वैतरणा खोऱ्यात पिंजाळ नदीवर कोशिमशेत व गारगाई नदीवर उधळे धरणे अशी धरणे प्रस्तावित आहेत. एकात्मिक जल आराखड्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार ७.१३ टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे प्रस्तावित आहे. प्रारूप सविस्तर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाचा खर्च रू. ६६६५ कोटी (दरसूची २०१९-२०) असून लाभव्यय गुणोत्तर ३.२६ आणि आर्थिक परतावा दर २१.३० टक्के आहे. या नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत तयार करण्यात येत असून तो सप्टेंबर २०२३अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे.दमणगांगा-एकदरे -गोदावरीदमणगंगा (एकदरे)- गोदावरी (वाघाड) नदी जोड प्रकल्प ता. पेठ, जि. नाशिक या नदीजोड प्रकल्पांतर्ग दमणगंगा नदीवर १.१६ टीएमसी क्षमतेचे एकदरे धरण (ता. पेठ जि. नाशिक) बांधण्याचे प्रस्तावित आहे. ५.०५ टीएमसी पैकी ४.८९ टीएमसी पाणी एकदरे धरणातून उपसाद्वारे प्रवाही वळण योजना झार्लीपाडा, ता. दिंडोरी जि. नाशिक या वळण योजनेत सोडण्यात येणार आहे. झार्लीपाडा वळण योजनेतून पाणी प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील वाघाड धरणामध्ये व त्यापुढे जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे. प्रकल्पाची अद्ययावत किंमत दरसूची २०२०-२१नुसार रु. १६०० कोटी असून योजनेचे लाभव्यय गुणोत्तर २.१३ असून आर्थिक परतावा दर २०.२५ टक्के आहे.पार-गोदावरीपार-गोदावरी नदीजोड योजनेंतर्गत १७ धरणे बांधून या धरणातील पाणी प्रवाही पद्धतीने एकत्रित करून उपसा करून करंजवन धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या बोगद्याद्वारे ३.४२ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे प्रस्तावित आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ej253WF
No comments:
Post a Comment