Breaking

Wednesday, September 6, 2023

Mumbai News: चर्नी रोड स्थानकाचा कायापालट होणार, स्टेशन प्रशस्त होणार; काय काय सुविधा मिळणार? https://ift.tt/SljnNkx

मुंबई : गणेशोत्सव काळात गिरगाव चौपाटीसाठी येणारी सर्व गर्दीच्या व्यवस्थापनासाठी चर्नी रोड स्थानक तिकीट खिडकीच्या दोन पोर्टा केबिन हटवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वर्दळ सुलभ करण्यासाठी स्थानकातील प्रकाशयोजना, फलाटावर सुधारणा करण्यात येणार आहे.गणेशभक्तांच्या स्वागतासाठी गिरगाव चौपाटीवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी सुरू झाली आहे. गिरगाव चौपाटीला जाण्यासाठी भाविक चर्नी रोड स्थानकात उतरतात. यामुळे पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी नुकतीच चर्नी रोड स्थानकाची पाहणी केली. चर्नी रोड स्थानकाच्या पश्चिमेला दोन पोर्टा केबिन आहेत. यातून तिकीट विक्री करण्यात येते. उत्सव काळातील गर्दी लक्षात घेता या दोन्ही केबिन हटवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्याऐवजी एक पोर्टा केबिन बसविण्यात येणार आहे. कमी जागा व्यापणारे आधुनिक एटीव्हीएम कार्यान्वित करण्यात येणार आहे. यूपीआय माध्यमाने स्कॅन करून प्रवाशांना तिकीट घेण्याची सुविधा आधुनिक एटीव्हीएममध्ये आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. गिरगाव चौपाटी, स्थानकातील स्वच्छतागृह, दिव्यांग डबा, मोफत पाणी, फलाट क्रमांक आणि इंडिकेटर यात आवश्यकतेनुसार बदल करावा, फलाटावरील स्टॉलने अतिरिक्त जागा व्यापल्यास स्टॉल व्यतिरिक्तची जागा तातडीने मोकळी करावी. स्थानकासह अन्य सुविधा आणि सुधारणा कामे उत्सव सुरू होण्याआधी पूर्ण करावीत, अशा सूचना पाहणीदरम्यान नीरज वर्मा यांनी दिल्या आहेत.चर्नी रोड स्थानकातील पश्चिमेकडील पोर्टा केबिन हटवण्यासह स्थानक आणि फलाट सुधारण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे उत्सव काळातील गणेशभक्तांचा स्थानकातील प्रवास अधिक सुखद आणि गर्दीमुक्त होईल. - सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1JSlZYH

No comments:

Post a Comment