ठाणे: भावाने मोठ्या बहिणीची लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी ठाण्यातील कोकणीपाडा परिसरात घडला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कोकणीपाड्यातील कुंटे चाळीत दुर्गा कुंटे (३६) कुटुंबियासह राहत होत्या. त्यांचे पती पानटपरी चालवतात. दुर्गा यांना एक बहीण आणि दोन भाऊ असून भावंडामध्ये त्या सर्वात मोठी होत्या. त्यांचा भाऊ संजू लोखंडे (३०) पुण्यात राहत असून अधूनमधून तो ठाण्यातील बहिणीच्या घरी येत होता. संजू विवाहित असून पत्नी आणि मुले मात्र त्याच्यासोबत राहत नाहीत. २६ ऑक्टोबर रोजी संजू बहिणीच्या घरी आला होता. शनिवारी सायंकाळी दुर्गा आणि तिचा १७ वर्षांचा मुलगा घरात झोपले असताना कोणतेही कारण नसताना घरातील लोखंडी रॉडने दुर्गा यांना बेदम मारहाण केली. तसेच, भाच्यालाही रॉडने मारहाण केली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुर्गा यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. आरोपी संजू याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TylaKjz
No comments:
Post a Comment