वृत्तसंस्था, तेल अविव : इस्रायलच्या सुरक्षा दलांनी सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी रात्री गाझा परिसरामध्ये कारवाई केली. या कारवाईमध्ये ‘हमास’च्या खान युनिस बटालियनचा म्होरक्या मधथ मुबशर मारला गेला. तसेच, ‘इस्लामिक जिहाद’च्या जेनिन शाखेचा प्रमुख अयसर महंमद अल-आमीरही चकमकीमध्ये मारला गेल्याच्या माहितीला इस्रायलच्या लष्कराने दुजोरा दिला.‘हमास’चा नायनाट करण्यासाठी इस्रायल गाझा पट्टीमध्ये भू-लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या कारवाईसाठी सातत्याने हवाई हल्ले करून, पुढील हल्ल्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. इस्रायलच्या लष्कराने सलग दुसऱ्या दिवशी निवडक ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली. यामध्ये दहशतवाद्यांची भुयारे, रॉकेट प्रक्षेपणाची ठिकाणे नष्ट करण्यात आली. या कारवाईमध्येच मधत मुबशरला ठार मारण्यात आले.या कारवाईवेळी इस्रायलचे एक ड्रोन कोसळले. त्यामागे तांत्रिक कारण असल्याचे सांगण्यात आले. तसेच, या ड्रोनमधून कोणतीही संवेदनशील माहिती दहशतवाद्यांच्या हाती पडली नसल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जेनिन भागातील निर्वासितांच्या शिबिरांमध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर त्यांची इस्रायली लष्कराबरोबर चकमक झाली. यामध्ये अयसर महंमद अल-आमीर ठार झाला. लष्कराच्या पश्चिम किनारपट्टीतील छाप्यांमध्ये ‘हमास’च्या १७ दहशतवाद्यांसह आणखी १९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. इस्रायलच्या कारवाईमध्ये आतापर्यंत सात हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेचे सीरियामध्ये हल्लेवॉशिंग्टन : अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी सीरियाच्या पूर्व भागातील दोन ठिकाणांवर हल्ले केले. ही दोन्ही ठिकाणे इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’शी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या सीरिया आणि इराकमधील लष्करी तळांवर गेल्या आठवड्यात ड्रोन हल्ले झाले होते. त्याचा बदला म्हणून अमेरिकेने हे हल्ले केले आहेत.‘बॉम्बफेक थांबवा’न्यूयॉर्क : ‘बॉम्बफेक थांबवा आणि निष्पापांचे जीव वाचवा,’ असे आवाहन पॅलेस्टिनींच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये केले. मात्र, इस्रायलच्या प्रतिनिधींनी त्याला नकार दिला आणि ‘हमास’ला नष्ट करेपर्यंत हल्ले सुरू राहतील, असे स्पष्ट केले.अमेरिकेने निर्बंध वाढवलेलंडन : ‘हमास’ला मिळणारा निधी रोखण्यासाठी अमेरिकेने शुक्रवारी आणखी निर्बंध लादले आहेत. अमेरिकेकडून दुसऱ्यांदा निर्बंधांची घोषणा केली. यामध्ये ‘हमास’शी संबंधित व्यक्ती आणि संघटनांवर निर्बंध आहेत. यामध्ये ‘हमास’चा इराणमधील प्रतिनिधी आणि इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इराण-‘हमास’मध्ये चर्चामॉस्को : इराणचे राजकीय कामकाजासंबंधींचे परराष्ट्र उपमंत्री अली बघेरी कानी यांनी शुक्रवारी मॉस्कोमध्ये ‘हमास’च्या प्रतिनिधीची भेट घेतली. शस्त्रसंधी आणि गाझामध्ये मानवतावादी मदत देण्यासंबंधी या भेटीमध्ये चर्चा झाली. इराणकडून या भेटीचा निषेध केला जाण्याची शक्यता आहे.चीनचे विमान अमेरिकेच्या बॉम्बरजवळबँकॉक : चीनचे लढाऊ विमान अमेरिकेच्या बी-५२ या बॉम्बर विमानापासून १० फूट अंतरापर्यंत पोहोचले होते. दक्षिण चीन समु्द्राच्या आकाशामध्ये ही घटना घडल्याचे अमेरिकेच्या लष्कराकडून सांगण्यात आले. या घटनेमध्ये अपघात टळला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KUHFawu
No comments:
Post a Comment