मुंबई: नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये महत्त्वपूर्ण सेवा दिलेले आणि आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेचे नेतृत्व केलेले यांची नौदलाचे ‘चीफ ऑफ पर्सनल’ म्हणून नियुक्ती झाली आहे. संवाद व इलेक्ट्रॉनिक युद्धपद्धतीत कुशल असलेले व्हाइस अॅडमिरल स्वामिनाथन हे १ जुलै १९८७ ला नौदलात रुजू झाले. त्यांना परदेशातील विविध संरक्षण संस्थांमधील प्रशिक्षणाचा अनुभव आहे. नौदल कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ‘आयएनएस विद्युत’, ‘आयएनएस विनाश‘, ‘आयएनएस कुलीश’ या क्षेपणास्त्र युद्धनौकांसह ‘आयएनएस म्हैसूर’ ही क्षेपणास्त्र विनाशिकेचेही नेतृत्व केले होते. त्यानंतर ‘अॅडमिरल’ श्रेणीतील बढती दरम्यान त्यांनी दक्षिण नौदल कमांडचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी, पश्चिम कमांड युद्धनौका ताफा प्रमुख, केंद्र सरकारचे समुद्री सुरक्षा सल्लागार, पश्चिम कमांडचे चीफ ऑफ स्टाफ या पदांवर सेवा दिली. चीफ ऑफ पर्सनल म्हणून नियुक्ती आधी ते नौदल मुख्यालयात पर्सनल सेवा नियंत्रक होते. त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/04CtmO2
No comments:
Post a Comment