पुणे: पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ भरधाव चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता केळकर रस्त्यावर घडली. यामध्ये दोन ते तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक देत स्वतः एका पोलला जाऊन धडकला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. चारचाकी चालकाला सोबत त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. उमेश हनुमंत वाघमारे (४८) असे वाहन चालकाचे नाव तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (४४) असे गाडीमालकाचे नाव आहे. या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेत विश्वनाथ उपादे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश हनुमंत वाघमारे आणि त्याचा मित्र नटराज हे दोघे दारू पिऊन गाडी चालवत होते. नदी पात्रापासून अलका चौकच्या मार्गावर गाडी आणली असताना बेफाम वेगात चारचाकी अलका चौकाच्या दिशेने घेऊन जात होते. त्यादरम्यान गाडीवरचा त्यांचा ताबा सुटला आणि रस्त्यावर जात असणाऱ्या विश्वनाथ उपादे यांना उडवले. त्यानंतर त्यांनी दोन दुचाकींना धडक दिली. पॅसेंजर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. शेवटी एका लाईटच्या पोलाला जाऊन धडकला. यामध्ये पायी चालत जाणाऱ्या विश्वनाथ उपादे यांचा मृत्यू झाला तर दोन ते तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर केळकर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. प्रक्षुब्ध जमावाने कारवर हल्ला करून कारचालकाला मारहाण केली. विश्रामबाग पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे. घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ujMz2kN
No comments:
Post a Comment