म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज, शनिवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून देण्यात येणाऱ्या मदतनिधीचा ते आढावा घेतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.२३ सप्टेंबर रोजी नागपुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हजारो नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २४ सप्टेंबरपासूनच प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले असून आतापर्यंत २२ हजार ८२४ पंचनामे करण्यात आले. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट मदतीचे वाटपही सुरू झाले आहे.या भागांची करणार पाहणीमहसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुपारी ३.३० वाजता काटोल तालुक्यातील कोंढाळी, पाणवडी, येरला, पारडशिंगा येथील नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी करतील. सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, नुकसानीच्या अनुषंगाने ई-पीक पाहणी पीकविमा, गौण खनिज वहिवाट रस्ते, सातबारा संगणकीकरण व लम्पी आदी विषयांवर आढावा घेतील. ८ ऑक्टोबर रोजी महसूलमंत्री चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी, साठवण, भिसी, वहानगाव या चिमूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकसानीचा आढावा घेतील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/59f0RgX
No comments:
Post a Comment