Breaking

Tuesday, October 24, 2023

गुरे चरण्यावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद; समोर येताच पुन्हा जुंपली, अन् घडलं धक्कादायक कृत्य https://ift.tt/9B7Yzir

पालघर: गुरे चरण्यावरून जुना वाद उफाळून आल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना खार्डी येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील खार्डी गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या वसंत सखाराम भोईर (५३) आणि प्रकाश यशवंत घरत (४५) या दोन शेतकऱ्यात म्हशी चरण्यावरून वाद होत होते. गुरे चरण्यावरूनच रविवारी संध्याकाळी मोठा वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी हे दोघे आपल्या म्हशी चरण्यासाठी आपल्या गावाच्या बाहेर लांबवर घेऊन गेले होते. याचदरम्यान म्हशी एकमेकांच्या कळपात घुसल्या. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांमध्ये जोरदार जुंपली आणि हाणामारी झाली. यावेळी आरोपी वसंत सखाराम भोईर (५३) याने प्रकाश यशवंत घरत (४५) याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. याप्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात आरोपी वसंत सखाराम भोईर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37Wdltu

No comments:

Post a Comment