Breaking

Tuesday, October 24, 2023

खरेदीच्या उत्साहावर तापमानाचा परिणाम? दसऱ्याला उन्हामुळे बाजार ओसाड https://ift.tt/Ls3VTbU

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दरवर्षी साधारणपणे नवरात्रीमध्ये मुंबईकर पाऊस अनुभवतात. यंदा मात्र नवरात्रीमध्ये दांडियाप्रेमींना पावसाने दिलासा दिला. या पार्श्वभूमीवर मुंबईतील तापमान चढे होते. दसऱ्याच्या दिवशीही तापमान चढे असल्याने दुपारच्या वेळेस बाजारांमध्ये गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. सोने खरेदीसाठी, नोंदणी केलेले सोने घेण्यासाठी सोनारांच्या दुकानामध्ये ग्राहक पोहोचले होते. मात्र त्या तुलनेत इतर खरेदीसाठी अनेकजण संध्याकाळनंतर बाजारात पोहोचले.मुंबईचे कमाल तापमान मंगळवारी सांताक्रूझ येथे ३६ अंश तर, कुलाबा येथे ३५.५ अंश सेल्सिअस होते. सांताक्रूझ येथे कमाल तापमान सोमवारपेक्षा फार चढे नव्हते. मात्र कुलाबा येथे २४ तासांमध्ये पाऱ्याने पुन्हा एकदा दोन अंशांची उसळी घेतली. याचा परिणाम सकाळनंतर तुलनेने बाजारांमध्ये कमी झालेल्या गर्दीमध्ये प्रतिबिंबित झाला. दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीसोबतच गॅजेट खरेदीचेही प्रमाण गेल्या काही काळात वाढले आहे. घरोघरी सरस्वती पूजन, शस्त्रपूजनासोबत लॅपटॉप, टॅब अशा आधुनिक उपकरणांचीही पूजा होते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ही उपकरणे घेण्याकडेही ग्राहकांचा कल असतो. दुपारच्या तापलेल्या पाऱ्यामुळे गॅजेटच्या दुकानात फारशी गर्दी नव्हती असे काही विक्रेत्यांनी सांगितले. यावर सणासुदीच्या निमित्ताने ऑनलाइन जाहीर होणाऱ्या ऑफर, गणेशोत्सवापासून मोठ्या विक्रेत्यांकडे सुरू झालेले सेल याचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे. काही वेळा अशा तापत्या उन्हात एसीचा वारा खाण्यासाठीही विण्डो शॉपिंगच्या निमित्ताने वीकेण्डला लोक मोठ्या मॉलमध्ये, मोठ्या दुकानांमध्ये जाताना दिसतात. मात्र, मंगळवार दुपारचे चित्र याला अपवाद ठरले. संध्याकाळच्या सुमारास काही दुकानांमध्ये गर्दी वाढू लागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सोन्यातील गुंतवणुकीवर भरवसादादरमधील इतर दुकानांमध्ये मंगळवारी फारशी गर्दी नसली तरी सोन्याच्या खरेदीसाठी लोक दिवसभर येत होते, असे निरीक्षण दादर व्यापारी संघाचे सचिव दीपक देवरुखकर यांनी नोंदवले. सकाळच्या सुमारास फारसे ग्राहक नव्हते. मात्र सध्याच्या आखाती युद्धस्थितीत सोन्याच्या गुंतवणुकीवरील विश्वास वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसत असल्याचे ते म्हणाले. सोन्याचे भाव दिवाळीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने सोने खरेदीकडे अनेकांचा कल होता. यातच आजची पिढीही सोन्यावर भरवसा ठेवत असल्याचे दसऱ्याच्या निमित्ताने समोर आल्याचे सांगण्यात आले. दसऱ्याच्या निमित्ताने सोनेखरेदीची परंपरा आणि संस्कृती ही व्यावहारिक आहे ही जाणीव पुन्हा एकदा लोकांमध्ये अधोरेखित होत असल्याचे सोने व्यापाऱ्यांनी सांगितले. दादरसारख्या भागामध्ये शिवाजी पार्कवर भाषणासाठी पोहोचू पाहणाऱ्यांसोबतच खरेदी करणाऱ्यांचीही संख्या संध्याकाळी वाढल्याचे चित्र होते.Read And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xv0sESX

No comments:

Post a Comment