बारामती: घरगुती वादाच्या कारणावरून पतीच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मधुकर कुंभार (वय ३५ वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, रा. पारवडी जाधव वस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी कविता सागर कुंभार (वय २८ वर्ष, रा. पारवडी जाधव वस्ती ता. बारामती जिल्हा पुणे) यांच्या विरोधात भादवि कलम ३०७, ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास राहत्या घरी घडली.पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सागर आणि कविता यांच्यात प्रापंचिक कारणावरून वाद होता. या वादातून कविताने पती सागर याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने उकळते गरम पाणी तोंडावर, छातीवर, पोटावर, गुप्त इंद्रिय आणि पाठीमागील गुदद्वारा जवळील भागावर टाकले. त्यात त्यांची कातडी ४० टक्के भाजली आहे. तसेच, आरोपी पत्नीने तेथे पडलेले लोखंडी चौकोनी छोट्या पाईपने फिर्यादीच्या डोक्यात आणि पाठीवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली.याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात आरोपी पत्नी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घुगे करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6qcnpUS
No comments:
Post a Comment