म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहर हे राज्यात डेंग्यूचे ‘हॉटस्पॉट’ ठरले असून सप्टेंबर महिन्यात डेंग्यू बाधितांच्या आकड्याने नवा उच्चांक गाठला आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल १,०६६ डेंग्यूचे सशंयित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २६१ रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चालू वर्षात डेंग्यूबाधितांचा आकडा हा ५२२ पर्यंत पोहचला आहे.हा सरकारी रुग्णालयांतील आकडा असून, खासगी रुग्णालयांतील रुग्णसंख्या त्याहूनही अधिक असल्याने शहरवासीय धास्तावले आहेत. डेंग्यूपाठोपाठ चिकूनगुनियानेही डोके वर काढले असून, सप्टेंबर महिन्यात तीन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. डेंग्यूसह व्हायरलचे रुग्ण वाढल्यामुळे महापालिकेची धूरफवारणी कागदावरच होत असल्याचे चित्र आहे.शहरात यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही डेंग्यूबाधित रुग्णांचा एकूण आकडा ५२२ वर पोहोचल्याने नाशिक डेंग्यूचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. जुलैपर्यंत शहरात अवघे १४४ डेंग्यूचे रुग्ण होते. ऑगस्टपासून पाऊस गायब असल्याने डेंग्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. परंतु, ऑगस्टमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिकच वाढत जावून एकट्या ऑगस्टमध्ये ११७ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ९९ रुग्ण होते. यंदा मात्र पावसाळा कमी असतानाही ही रुग्णसंख्या ११७ पर्यंत पोहचली होती. तर सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने डेंग्यूबाधितांचा विस्फोट झाला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात १,०६६ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी २६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात १३९ रुग्ण डेंग्यूबाधित होते. त्यामुळे यंदा सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूचा प्रकोप पहायला मिळत आहे. या प्रकोपामुळे डेंग्यूबाधितांचा आकडा आता ५२२ पार झाला आहे. हा सरकारी आकडा असला तरी, खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. परिणामी, नाशिकमध्ये वाढत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांबाबत आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली. तसेच महापालिकेची कानउघडणी करततातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश गेल्या महिन्यात दिले होते. त्यानंतरही डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.खासगी रुग्णालये फुल्लडेंग्यू आणि व्हायरलने फीवरने शहर आधीच तापले असताना आता चिकूनगुनियाचेही रुग्ण वाढत चालले आहे. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यात चिकूनगुणियाचा एक रुग्ण आढळला होता.त्यात आणखीन दोन रुग्णांची वाढ झाली असून चिकूनगुनियाचे तीन रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील साथीच्या आजारांमध्येही वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयातून उपचार घेणाऱ्याचा आकडा सरकारी रुग्णालयांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.धूरफवारणी कागदावरचशहरात मलेरिया विभागाने चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचा अजब दावा विभागाकडून केला जात आहे. दुसरीकडे डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून नष्ट करण्यासाठी शहरात ६२ आरोग्य पथके तैनात केली आहेत. या पथकांमार्फत शहरात तपासणी सुरू असल्याचा दावाही पालिकेकडून केला जात आहे. मात्र, तरीही रुग्णसंख्या वाढत असल्याने धूर फवारणीचे काम कागदावरच होत असल्याचे चित्र आहे.महिनानिहाय रुग्णवाढ...जानेवारी - १७फेब्रुवारी - २८मार्च - २८एप्रिल - ८मे - ९जून - २६जुलै - २८ऑगस्ट - ११७सप्टेंबर - २६१एकूण - ५२२
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/w8AitHu
No comments:
Post a Comment