नांदेड: बाहेर राज्यातून पिस्टल आणून नांदेडमध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७ पिस्टल आणि ११६ जिवंत काडतूस जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती आहे. कमलेश उर्फ आशु पाटील बालाजी लिंबापुरे ( वय २३ रा. वसरणी), बलबीरसिंग शेरा ( वय २१, रा.हिंगोली गेट नांदेड), शेख शाहबाज शेख शकील ( वय २३ रा. रहिमपूर नांदेड), श्यामसिंघ मठवाले ( वय २३, नांदेड ) आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्ररकरणातील मुख्य आरोपी आशिष सपूरे आणि गब्या हे दोघेजण फरार आहेत. विशेष म्हणजे टोळीतील हे सर्व आरोपी बिहार, मध्यप्रदेश राज्यातून गावठी पिस्टल आणून नांदेडमध्ये विक्री करत होते. भाईगिरी करण्यासाठी तसेच इन्स्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी टोळीकडून पिस्टल खरेदी करायचे. २०२० पासून ही टोळी सक्रिय होती. या गुन्हेगारीसाठी या शस्त्राचा वापर केला जातं होता. दोन दिवसा पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीतील सदस्यांना गावठी पिस्टल विक्री करत असताना अटक केली. यावेळी या आरोपीनी पोलिसांवर हल्ला देखील केला होता. पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतल्या नंतर झाडाझडती घेतली, यावेळी त्यांच्याकडे सात पिस्टल आणि ११६ काडतूस आढळून आले. या प्रकरणातील सपूरे आणि गब्या हे फरार असून पोलिसांनी माहिती देणाऱ्यांना २५ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मिसुर्डे न फुटलेले मुलेही पिस्टल बाळगत असल्याचे समोर आले आहे. पिस्टल बद्दल एक आकर्षण निर्माण झाले असून एक फाॅशन म्हणून त्याची मागणी केली जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी शंभरावर पिस्टल जप्त केल्या आहेत. दरम्यान, शस्त्रासोबत फोटू काढून ती मिरवणे असे प्रकार घडत आहेत. यासाठी नागरिकांनी परिसरात घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून त्याची माहिती पोलिसांना दिली, गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. शहरात आणि जिल्ह्यात कोणी आरेरावी करत असेल, भिती दाखवत असेल, खंडणी मागत असेल, अशी माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BuiV4zM
No comments:
Post a Comment