Breaking

Monday, October 2, 2023

मुंबईत भरदिवसा एसी लोकलवर दगडफेक; हल्लेखोराच्या चौकशीत धक्कादायक कारण उघड https://ift.tt/GuVKwgB

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : बायकोशी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून एका तरुणाने कांदिवली स्थानकात एसी लोकलवर दगडफेक केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या दगडफेकीत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. आरपीएफच्या जवानांनी या तरुणाला अटक केली.चर्चगेटहून विरारला जाणारी एसी लोकल सोमवारी दुपारी २.५३ वाजता नियोजित वेळेवर रवाना झाली. ही लोकल बोरिवली ते कांदिवलीदरम्यान ३.३८ वाजता दाखल होताच रेल्वे रुळांवरून एका तरुणाने या लोकलच्या दिशेने दगड भिरकावला. एसी लोकलच्या खिडक्यांमध्ये दुहेरी काच असल्याने हा दगड दोन्ही काचांमध्ये अडकला. यामुळे डब्यातील प्रवाशांना काहीच दुखापत झाली नाही. मात्र अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी एक तरुण रुळांवरून जात असल्याचे त्यांना दिसले. आरपीएफने त्याची चौकशी करताच त्याने याबाबत कबुली दिली. घरात बायकोशी झालेल्या भांडणातून आधी स्वत:ला दगडाने मारून घेतले, त्यानंतरही राग शांत होत नसल्याने एसी लोकलवर दगड फेकला, असे त्याने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zSEc7qh

No comments:

Post a Comment