Breaking

Thursday, October 5, 2023

खजिन्याने भरलेले १४०० वर्ष जुने मंदिर, उत्खनतात सापडल्या ३५ सोन्याच्या फॉइल https://ift.tt/irevgGn

ओस्लो: नॉर्वेतील पुरातत्वशास्त्रज्ञांना एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना येथील एका मंदिरात नॉर्स देवतांच्या लहान मूर्ती सापडल्या आहेत ज्या चौकोनी आहेत आणि सोन्याने घडवलेल्या आहेत. या मूर्ती कागदाच्या तुकड्यासारख्या पातळ आहेत. या तुकड्यांमध्ये नॉर्स देव फ्रॉय आणि गर्ड देवी यांचे चित्रण करणारे आकृतिबंध आहेत. या मूर्ती ५५० एडी मध्ये सुरू झालेल्या आणि वायकिंग युगापर्यंतच्या मेरोव्हिंगियन कालखंडातील आहेत. याचा उपयोग बळी देण्यासाठी केला गेला असावा असं मानलं जात आहे.ओस्लो विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, व्हिंग्रोममधील होव्ह फार्मजवळ रस्त्याच्या कडेला एकूण ३५ सोन्याचे तुकडे सापडले आहेत.या सोन्याच्या तुकड्यांमध्ये छिद्र नाहीत. त्यामुळे ते दागिने म्हणून परिधान केले जाण्याची शक्यता फारच कमी आहे. १७२५ मध्ये स्कॅन्डिनेव्हियामध्ये पहिले सोन्याचे फॉइल सापडले होते, ज्याला नंतर गुलग्लबर असे नाव देण्यात आले. या उत्खननाचे नेतृत्व करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञ कॅथरीन स्टीन यांनी याला अतिशय खास शोध म्हटले आहे. ते म्हणाला की प्रत्येक फॉइल खूप लहान आहे आणि त्याचा आकार नखाएवढा आहे.सोन्याच्या फॉइलच्या अंदाजे तीन डझन तुकड्यांपैकी बरेच तुकडे इमारतीच्या बीममध्ये पॅक केले गेले होते. उर्वरित भिंती आत सापडले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनी १९९३ मध्ये दोन सोन्याच्या फॉइल जडलेल्या या छोट्या इमारतीचा शोध लावला होता. २००० च्या दशकात उत्खननात २८ सोन्याचे तुकडे सापडले. तर, नॉर्वे आणि संपूर्ण स्कॅन्डिनेव्हियामध्ये त्यासारखेच फॉइल सापडले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच एका छोट्या संरचनेत याचा शोध लावला आहे.ओस्लो येथील म्युझियम ऑफ कल्चरल हिस्ट्रीचे पुरातत्वशास्त्रज्ञ इंगुन मारिट रोस्टॅड म्हणाले, 'सोन्याचे हे छोटे तुकडे दिसत असतात. एकतर ते उत्खननाद्वारे शोधले जातात किंवा ते मेटल डिटेक्टरद्वारे सापडतात. म्हणून, यापैकी अधिक नॉर्वेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आढळू शकतात. दुसर्‍या ठिकाणी उत्खननादरम्यान, पुरातत्वशास्त्रज्ञांना ३० फॉइल सापडले आहेत. स्टेन म्हणाले की, आम्हाला असे फॉइल बहुतेक प्राचीन धार्मिक स्थळांवरून सापडले आहेत. मात्र छोट्या इमारतीतून हे मिळणे आश्चर्यकारक आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yzAl0BK

No comments:

Post a Comment