Breaking

Wednesday, October 4, 2023

दुचाकीवरुन निघाले, रस्त्यातच चारचाकीची धडक अन् महापालिकेच्या कर्मचाऱ्याची अचानक एग्झिट https://ift.tt/LYAKuQ8

सांगली: महापालिकेचे वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असणारे रवींद्र बापू केसरे (वय ५२, रा. कसरे गल्ली, खणभाग) यांचा अपघाती मृत्यू झाला. दिव्यांग असलेले केसरे यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्याने पालिका वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला. आपटा पोलिस चौकीजवल शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.याबाबत अधिक माहिती अशी कि, रवींद्र केसरे हे वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत होते. गेल्या पाच वर्षांपासून ते प्रधानमंत्री आवास योजनेचे सभापती जगन्नाथ ठोकळे यांचे स्वीय सहायक म्हणून काम करत होते. अत्यंत प्रामाणिकपणे रवींद्र केसरे हे सेवा बजावत होते. शुक्रावारी (ता. २९) सकाळी ते आपल्या दुचाकीवरून आपटा पोलिस चौकीजवळून निघाले होते. त्यावेळी चारचाकीची धडक झाली. त्यात ते जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पालिकेच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर सर्वचस्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2gsJPov

No comments:

Post a Comment