हैदराबाद: चुकांची दुरुस्ती आणि आघाडीच्या खेळाडूंना सूर गवसण्याची आस... वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानसाठी सध्या हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. आज, शुक्रवारी त्यांची वर्ल्ड कप सलामी दडपणाशिवाय खेळण्यात पटाईत असलेल्या नेदरलँड्सशी होते आहे.पाकिस्तानला आशिया कपची अंतिम फेरीही गाठता आली नव्हती. तर, वर्ल्ड कपच्या दोन्ही सराव सामन्यांत ते पराभूत झाले. वर्ल्ड कपच्या बाद फेरीत प्रवेश करायचा असेल तर पाकिस्तानने सुरुवातीपासूनच कामगिरी उंचावणे महत्त्वाचे आहे.मुळात पाकिस्तानच्या समस्यांची सुरुवातच फलंदाजीतील पहिल्या क्रमांकापासून होते. इमाम उल हकची वनडेतील सरासरी ५०पेक्षा जास्त आहे; पण भारताच्या पाटा खेळपट्ट्यांवर त्याच्याकडून सर्वोच्च स्ट्राइक रेटने धावा अपेक्षित आहेत. नेदरलँडविरुद्ध इमाम पाकिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात करेल; पण त्याचा जोडीदार म्हणून फखर झमान किंवा अब्दुल्ला शफीक यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणारा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानचे फॉर्मात असणे पाकिस्तानसाठी सकारात्मक बाब ठरेल. इफ्तिकार अहमदही धावा करतो आहे, पण मधल्या फळीत अलमान आगा याला संधी मिळणार का, हे बघावे लागेल. हैदराबादेत पार पडलेल्या सराव सामन्यांचे स्कोअरबोर्ड बघून अंदाज बांधल्यास शुक्रवारीही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे गोलंदाजांनी अधिकाधिक चुका टाळणे आवश्यक आहे.आयपीएल न खेळण्याचा फटका?पाकिस्तानच्या खेळाडूंचा आयपीएलसाठी विचार होत नाही. त्यांच्यावर बंदी आहे. त्यामुळे त्यांना भारतीय खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही. इथल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाशी सांगड घालत खेळणे त्यांना कठीण जाणार हे नक्की. 'इथली सीमारेषा कमी अंतरावर आहे. याचा अर्थ गोलंदाजांची सर्वांत कठीण परीक्षा. त्यांनी थोडी जरी चूक केली तरी फलंदाज फायदा उठविणार. त्यामुळे धावांची बरसात अपेक्षितच आहे. या परिस्थितीनुसारच आम्हाला खेळावे लागेल', असे पाकिस्तानचा कर्णधार बाबर म्हणाला.नसीमची अनुपस्थितीनसीम शाहच्या गैरहजेरीत पाकिस्तानचा मारा निष्प्रभ वाटला. उपकर्णधार शादाब खान आशिया कपपासूनच संघर्ष करताना दिसतो आहे. तुलनेत लेगस्पिनर उसामा मीर प्रभावी ठरतो. नेदरलँड्सविरुद्ध शादाब आणि मीर हे दोघेही अंतिम अकरामध्ये खेळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या हारिस रौफने ९७ धावांची खैरात वाटली होती. अशा चुका मुख्य फेरीत अंगलट येतील.नेदरलँड २०११ नंतर प्रथमचनेदरलँड्स संघ २०११नंतर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप खेळत आहे. दोन्ही सराव सामने पावसामुळे वाया गेल्यामुळे नेदरलँड्सची पूर्वतयारी कच्ची राहिली. हा संघ जुलैमध्ये वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीत खेळला होता. त्यावेळी त्यांनी वेस्ट इंडिज आणि आयर्लंडला मागे टाकले होते. वेस्ली बारेसी हा २०११च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेला खेळाडू यावेळी नेदरलँड्सच्या गोटात आहे.आंध्रचा तेजा मधल्या फळीतनेदरलँड्सच्या मधल्या फळीत तेजा निदामानुरू हा फलंदाज आहे. तेजचा जन्म आंध्र प्रदेशचा आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा ३८ वर्षीय माजी स्पिनर रोलॉफ व्हॅन डर मर्व्ह हादेखील नेदरलँड्सचा गोटात आहे. वर्ल्ड कपचा अनुभव असलेल्या टिम डी लीडे याचा मुलगा अष्टपैलू बास डी लीडे याच्याकडून नेदरलँड्सला अपेक्षा आहेत. स्कॉटलंडविरुद्धच्या प्राथमिक फेरीच्या लढतीत त्याने ९२ चेंडूंत १२३ धावांची खेळी केली होती.पाकिस्तान वि. नेदरलँड्सठिकाण : राजीव गांधी स्टेडियम, हैदराबादवेळ : दुपारी दोनपासूनप्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टारनाणेफेकीचा अंदाज : नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी स्वीकारण्याची शक्यता अधिक. येथे प्रथम फलंदाजी करणारा संघ चारवेळा, प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ तीनवेळा जिंकला आहे.खेळपट्टीचा अंदाज : या स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडू नरम झाल्यानंतर सहज फलंदाजी करता येते. फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार, पण वेगवान गोलंदाजही फायद्यात असतील.हवामानाचा अंदाज : दिवसा ३२ अंश तर संध्याकाळी २४ अंश तापमानाची शक्यतापाकिस्तानचे महत्त्वाचे खेळाडू : बाबर आझम, मोहम्मद रिझवान, हारिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदीनेदरलँड्सचे महत्त्वाचे खेळाडू : कॉलिन अॅकरमन, बास दी लीड, व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीकगेल्या पाच लढतींत : पाकिस्तानचे दोन विजय, दोन पराभव, एक अनिर्णित. नेदरलँड्सचे दोन विजय, दोन पराभव, एक बरोबरीआमने-सामने : ६ सामने. पाकिस्तानचे विजय ६गेल्या पाच सामन्यांत प्रतिस्पर्धी : पाकिस्तानचेच पाच विजय
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vEP5w0C
No comments:
Post a Comment