Breaking

Thursday, October 12, 2023

ठाकरे-शिंदे गटात 'ललितायण', ड्रग्ज माफिया ललित पाटीलला शिवसेनेत कोणी आणलं? नाशकात फोटो वॉर https://ift.tt/u1YSj64

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ड्रग्ज माफिया (पानपाटील) याच्या राजकीय कनेक्शनवरून आता शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांतच आरोप-प्रत्यारोपांचे ‘वॉर’ सुरू झाले आहे. एकमेकांवर केल्या जाणाऱ्या राजकीय चिखलफेकीमुळे अर्थात ‘ललितायण’मुळे आगामी काळात ‘महाभारत’ होण्याची चिन्हे आहेत.

काय आहेत आरोप-प्रत्यारोप?

‘सन २०१४ मध्ये पक्षात पदावर नव्हतो. अजय बोरस्ते महानगरप्रमुख होते. महानगरप्रमुखाच्या परवानगीशिवाय प्रवेश होत नसून, त्यांनी केलेले पाप माझ्या माथी मारू नये,’ असा दावा विनायक पांडे यांनी गुरुवारी केला. त्यावर ललित हा विनायक पांडेंचाच कार्यकर्ता असून, त्यांच्या आग्रहास्तवच त्याला शिवसेनेत प्रवेश दिला. मी केवळ महानगरप्रमुख म्हणून तेथे उपस्थित होतो, असा खुलासा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.‘कुत्ता गोली’पाठोपाठ एमडी ड्रग्जने नाशिककरांची झोप उडवली असतानाच आता या प्रकरणात नेत्यांचाही सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार ललित पाटील (पानपाटील) याचा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाशी संबंध असल्याचा पुरावा समोर येत आहे. शहरातील एका महिला आमदारासह एका मंत्र्यानेदेखील या प्रकरणात हस्तक्षेप केल्याची चर्चा असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला दुजोरा देणारे वक्तव्य केल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे.शिंदे गटाचे कनेक्शन समोर आल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी ललित याला विनायक पांडेंनीच शिवसेनेत आणल्याचा आरोप केला होता. त्याला पांडेंनीही प्रत्युत्तर दिल्यावर संशयाची सुई शिंदे गटाकडे वळाली. पालकमंत्री भुसेंनी त्यांचे पाप हे दुसऱ्याच्या माथी मारू नये. ललितसोबत २०१६ पासून माझा कोणताही संबंध नाही. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कार्यकर्तां म्हणून नेत्यांकडे लोक जात असतात. त्याच नात्याने तो माझ्याकडे आला असेल, असे सांगत पांडेंनी त्याच्यासोबतचे संबंध फेटाळले आहेत. अजय बोरस्ते यांनी ललित पाटील हा पांडेंची वाढदिवसानिमित्त 'तुला' करायचा, गणेश मंडळांना भेटी द्यायचा यावरून त्याचे पांडेंसोबत कसे संबंध होते हे समोर येत असल्याचा दावा केला आहे.

ललितसोबतच्या फोटोंचे ‘वॉर’

दरम्यान, ललितसोबत असलेल्या संबंधांवरून शिंदे आणि ठाकरे गटांत सलग दुसऱ्या दिवशीही ललितसोबतच्या फोटोंचे ‘वॉर’ सुरूच राहिले. ठाकरे गटाने गुरुवारी ललित याचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांच्यासोबतचे फोटो व्हायरल केले. त्यानंतर शिंदे गटानेही ललित हा विनायक पांडेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची तुला करीत असल्याचे फोटो व्हायरल केले. या सर्व प्रकारामुळे नाशिककरांसमोर मात्र कोणाचे कोणाशी संबंध आहेत याची उकल होत असल्याचे चित्र आहे.Read Latest And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Evrstad

No comments:

Post a Comment