म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवात ‘लेझर शो’मुळे तीन नागरिकांना दुखापत झाली आहे. या तिघांची दृष्टी गेल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणासंबंधी दाखल याचिकेवर न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. ‘लेझर शो’ला कोणता विभाग परवानगी देतो, यासंबंधी पुढील सुनावणीत माहिती सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला.औरंगाबाद खंडपीठाने गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणासंबंधी खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रातील बारा जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षक, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता. नियमानुसार आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला होता. गणेशोत्सव संपल्यानंतरही खंडपीठाने याचिकेचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रियांका शिंदे यांनी विविध वर्तमानपत्रातील वृत्तांचा आधार घेऊन, गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझरमुळे तीन गणेशभक्तांना दृष्टी गमवावी लागली, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने यावर महापालिकेचे वकील सुहास उरगुंडे यांच्याकडे विचारणा केली. अॅड. उरगुंडे यांनी लेझर शोला परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित अधिकार कुणाकडे आहे, यासंबंधी स्पष्टीकरण पुढील सुनावणीत द्यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.‘मटा’च्या वृत्ताची दखलगणेशोत्सवात लेझरच्या झगमगाटात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. तीन भाविकांना लेझरच्या प्रकाशाने इजा झाली. महापालिका प्रशासन लेझरला परवानगी देत नाही. त्यामुळे पुढील सुनावणीत परवानगी कुणी दिली यावर माहिती सादर केली जाणार आहे. राज्यभरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्ताचा दाखला देऊन, याचिकाकर्त्याच्या वतीने माहिती सादर करण्यात आली. औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील बारा जिल्ह्यांतील तीन घटनांचा उल्लेख करण्यात आला.‘सुमोटो याचिका दाखल करावी’पुणे : सण, उत्सव आणि थोर व्यक्तींच्या जयंती दिनी मोठ्या प्रमाणावर स्पीकरचा वापर केला जात असून, त्यात आवाज मर्यादेचे सर्व नियम पायदळी तुडवले जातात. त्यामुळे सामान्य जनतेच्या हितासाठी स्पीकरच्या अतिरेकी वापराबाबत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करावी, असे आवाहन पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्ये यांना केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण झाले. तसेच, धोकादायक लेझर बीम लाइटचा वापर करण्यात आला. त्या विरोधात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रकाशित करून आवाज उठवला. लोकांनीदेखील ती भूमिका उचलून धरली आहे.नाशिकमध्ये डीजे, लेझरला मनाईनाशिक : आदिशक्तीची आराधना करीत चार दिवसांनी सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त नाशिक शहर पोलिस दलाच्या बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण झाले आहे. नाशिक येथील कालिका देवी आणि भगूर येथील रेणुका देवी यात्रोत्सवास सीसीटीव्ही तैनात असतील. शहरात आयोजित होणाऱ्या गरबा व दांडियाकरीताही सीसीटीव्ही अनिवार्य आहे. यासह डीजे व लेझरला मनाई असल्याची भूमिका पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केली आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर केल्याने सात गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर डीजे चालकांवरही गुन्हे दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवातही पोलिस आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार शहरातल्या लहानमोठ्या मंडळांसह गरबा व दांडिया आयोजकांना संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ir0ljTE
No comments:
Post a Comment