नवी दिल्ली: एका फ्लॅटमध्ये एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. दिल्लीतील मुनिरका भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तेथे तीन मृतदेह पडलेले दिसले. तिघांचेही मनगट कापलेले होते. महिलेचा पती एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) मध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.दिल्ली पोलिसांना सकाळी साडेदहा वाजता मुनिरका भागातील एका फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. यावर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर पोलिसांनी चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर १०८/३ मध्ये प्रवेश केला. यावेळी गादीवर तीन मृतदेह पडलेले आढळून आले. त्यात एक महिला आणि दोन मुले (४ वर्षे आणि २.५ वर्षे) होती. तिघांचेही मनगट धारदार शस्त्राने कापण्यात आले होते. वर्षा शर्मा (२७ वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून, त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील होत्या. जगेंद्र शर्मा यांच्यासोबत त्यांचं २०१७ मध्ये त्यांचे लग्न झालं होतं. त्यांचे पती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनीही आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण काय, हे तपासाअंती कळेल. मुलांचे मनगट कापून महिलेची आत्महत्यासुरुवातीच्या तपासात महिलेने दोन्ही मुलांचे मनगट कापल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यानंतर तिने स्वत:चे मनगट कापून आत्महत्या केली. एफएसएल आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/01hH7yA
No comments:
Post a Comment