वृत्तसंस्था, बेंगळुरू: कर्नाटकात फटाक्यांच्या गोदामामध्ये झालेल्या स्फोटामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. बेंगळुरूजवळील अनेकल तालुक्यातील अट्टीबेले गावामध्ये शनिवारी ही घटना घडली. मृतांमध्ये या गोदामामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा समावेश असून, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.अनेकल येथील या गोदामामध्ये शनिवारी दुपारी एका टेम्पोतून फटाके उतरवण्याचे काम सुरू होते. त्या वेळी काही कामगार गोदामाच्या आत काम करत होते. अचानक फटाक्यांचा स्फोट झाला आणि मोठी आग लागली. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जखमींचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना घडली, त्या वेळी ३५ कामगार गोदामात काम करत होते. या गोदामाचा मालक आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. नवरात्र आणि दिवाळीमुळे येथे फटाक्यांचा मोठा साठा करण्यात आला होता. आगीची तीव्रता इतकी मोठी होती, की गोदामाच्या परिसरातील काही वाहनेही जळून खाक झाली. हा परिसर तमिळनाडूच्या सीमेपासून जवळ असून, या कामगारांमध्ये तमिळनाडूतील काही जणांचा समावेश आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 'निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला आहे. तपासातील अहवालानुसार कारवाई करण्यात येईल,' असे सिद्दारामय्या यांनी सांगितले. कर्नाटक सरकाकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मृतांच्या नातेवाइकांना तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hf0edSp
No comments:
Post a Comment