Breaking

Wednesday, October 18, 2023

सोलापुरात मोठी कारवाई, ६ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त; दोन संशयित ताब्यात https://ift.tt/xmyCRnS

सोलापूर: राज्यभर एमडी ड्रग्जची कारवाई ताजी असताना, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोहोळ पोलिसांनी ३ किलो ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज साठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी एमआयडीसीत ड्रग्ज कारवाई केल्यानंतर सोलापुरात पुन्हा एकदा ड्रग्जचा साठा आढळला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या मोहोळ पोलिसांनी मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळ कारवाई केली आहे. जवळपास ६ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा हस्तगत करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे. दत्तात्रय लक्ष्मण घोडके आणि गणेश उत्तम घोडके (रा., औंढी ,ता. मोहोळ, जि सोलापूर) या दोघांना अटक केले आहे. अतिशय गुप्तपणे तपास करत सोलापूर पोलिसांनी कारवाई फत्ते केली आहे. दोघा संशयितांना कोर्टात हजर केले असता, २३ ऑक्टोबरपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.११६ कोटी नंतर ६ कोटींचा ड्रग्ज साठा सोलापुरात जप्तमुंबईच्या गुन्हे शाखेच्या युनिट-९ च्या दया नायक यांच्या टीमने सोलापुरातील गवळी बंधुंना ड्रग्ज विक्री करताना मुंबईत अटक केले होते. तपास करत असताना राहुल किसन गवळी आणि अतुल किसन गवळी हे सोलापूरचे असल्याचे निष्पन्न झाले होते. अधिक तपास करत असताना गवळी बंधुंनी सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसीत ड्रग्ज तयार करत असल्याची कबुली दिली होती. मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस सोमवारी पहाटेच्या सुमारास सोलापुरात येऊन ११६ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त करून गेले होते. ही घटना ताजी असताना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देवडी फाट्या जवळ ६ कोटींचा ड्रग्ज साठा पकडला आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईत गवळी बंधू जेरबंद झाले. तर, सोलापूर पोलिसांच्या कारवाईत घोडके बंधू जेरबंद झाले आहेत.सोलापूरचे नाव ड्रग्ज बाजारातसोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी परिसरातील एऑन लाईफ सायन्सेस नावाच्या कंपनीमध्ये २०१६ साली अशाच पद्धतीने ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत येथे ड्रग्जचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी देखील १८ हजार किलो इफेड्रीन ठाणे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले होते. त्यावेळी ममता कुलकर्णी आणि तिचा प्रियकर विकी गोस्वामी हे आरोपी होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्जवर कारवाई करण्यात येत आहे. सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय ड्रग्जच्या बाजारात येत असल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/raZdBI7

No comments:

Post a Comment