Breaking

Wednesday, October 18, 2023

नवरात्र उत्सवात चोरांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासन सतर्क, ११ चोरट्यांवर कारवाई https://ift.tt/dsyL0Bf

धाराशिव: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दररोज वाढत आहे. या गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचा सपाटा लावला आहे. हे रोखण्यासाठी दि. १६ आणि १७ ऑक्टोबर असे दोन दिवस तुळजापुर येथील यात्रेमध्ये पायी पेट्रोलींग करत असताना चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या यात्रेमध्ये फिरत असलेल्या २ पुरुष व ९ महिला अशा ११ चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सीआरपीसी कलम १०९ प्रमाणे कारवाई करुन बेड्या ठोकल्या आहेत. ही दमदार कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील सुमन कन्हैय्या मानकर (३०) आणि इतर ४ महिला तर कर्नाटक राज्यातील बिजापूर इंडी येथील श्रीकांत हरिदास होसमन (२२) आणि इतर एकास अटक केली आहे. तसेच दि. १७ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथील सलगर वस्ती (सेटलमेंट एरिया) अंजली मारूती लोंढे (२२) रा. सलगर वस्ती (सेटलमेंट एरिया) आणि इतर १ महिला तसेच सपोनि मनोज निलंगेकर हे पथकासह फिरत असताना २ संशयितरीत्या फिरणाऱ्या महिलांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनी मनोज निलंगेकर यांच्यासह पोहेकॉ हुसेन सय्यद, पोना अमोल चव्हाण, पोकॉ बलदेव ठाकूर, मपोकॉ रविंद्र आरसेवाड, रंजना होळकर, पो ना जावेद काझी, पोह प्रकाशअवताडे, शौकत पठाण आणि मपोका होळकर यांनी केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/V4wo5cd

No comments:

Post a Comment