Breaking

Thursday, October 19, 2023

आईस्क्रीम घ्यायला निघालेल्या गर्भवतीचा मृत्यू, ४ वर्षांचा मुलगा रात्रभर मृतदेहाजवळ बसून https://ift.tt/YQPgVjx

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. येथे आईस्क्रीम घेण्यासाठी चार वर्षांच्या मुलासह घरून निघालेली गर्भवती महिला गुरुवारी सकाळी नदीवरील पुलाजवळ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. यावेळी तिचा ४ वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेचं नाव सुषमा काकडे असल्याचं सांगितलं जात आहे.पोलिस अधीक्षक (एसपी) रवींद्र सिंग परदेशी यांनी सांगितले की, सुषमा काकडे बुधवारी रात्री ९.३० वाजता मुलगा दुर्वांश याच्यासोबत बल्लारपूर येथील टीचर्स कॉलनीतील घरातून बाहेर पडल्या होत्या. पण, रात्री उशीर होऊनही त्या परत आल्या नाहीत. एसपींनी सांगितले की, महिलेचा पती पवनकुमार काकडे हा बँकेत कर्मचारी आहे. त्याने सांगितले की पवन आणि त्याच्या इतर नातेवाईकांनी काही काळ सुषमाचा शोध घेतला आणि नंतर बल्लारपूर पोलिस ठाण्यात संपर्क साधला.राजुरा-बल्लारपूर रस्त्यावरील वर्धा नदीवरील पुलाजवळ सुषमा यांचा मृतदेह असल्याची माहिती काही लोकांनी पवन कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली. गुरुवारी पहाटे ४ वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता दुर्वांश मृतदेहाजवळ बसलेला दिसला.पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेतपरदेशी यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा ती पुलावरून चिखल असलेल्या भागात पडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सर्व पैलू तपासले जात आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Read And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ou783dM

No comments:

Post a Comment