मिर्झापूर: रामलीलामध्ये काम करणाऱ्या ७२ वर्षीय कुंवर बहादूर सिंग उर्फ भुलन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये रामलीला दरम्यान सीता स्वयंवरच्या दिवशी ही घटना घडली आहे. राजाची भूमिका साकारत असताना ही घटना घडली आहे. स्टेजवर डायलॉग बोलताना त्यांची प्रकृती खालावली आणि ते खाली कोसळले. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.रामलीला कमिटीच्या लोकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावातील रामलीलामध्ये सहभागी होण्यासाठी तो तीन दिवसांपूर्वी पुण्याहून आला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. तो पुण्यातील एका खासगी कंपनीत चौकीदार म्हणून कामाला होता. कुंवर बहादूर सिंग उर्फ भुलन गेल्या ५० वर्षांपासून रामलीलामध्ये भूमिका साकारत होते.रामलीला समितीच्या म्हणण्यानुसार, ते पेटहवा राजाची भूमिका करत आले आहेत. सीता स्वयंवर दरम्यान श्री राम धनुष्य मोडत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि जेव्हा ते अचानक कोसळले. तेव्हा लोकांनी धावत जाऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रामलीला समितीच्या म्हणण्यानुसार ते पेटहवा राजाची भूमिका करत आले आहेत. परशुरामची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधनअशीच एक घटना झारखंडच्या गढवामध्ये पाहायला मिळाली. जिथे भगवान परशुरामाची भूमिका साकारणाऱ्या एका कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ४० वर्षीय विनोद प्रजापती असे मृताचे नाव आहे.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dlcezAN
No comments:
Post a Comment