छत्रपती संभाजीनगर: सैलानी बाबाचं दर्शन घेऊन बुलढाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या झाला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली. तर दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. टेम्पो ट्रॅव्हल्स चालक कमलेश लहू म्हस्के यांच्या फिर्यादीवरून, आरटीओ अधिकारी प्रदीप छबुराव राठोड, नितीशकुमार सिद्धार्थ बोरणारकर आणि ट्रक चालक ब्रिजेशकुमार कमालसिंग चंदेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बारा ते एकच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर बुलढाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांच्या गाडीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंद्रानगर येथील रहिवासी बुलढाणा येथील सैलानी बाबांचे दर्शन करून रविवारी खाजगी बसने एम.एच. ०४ जी.पी. २२१२ ने नाशिककडे जात होते.यावेळी वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ आरटीओ अधिकाऱ्यांनी एम.पी. ०९ एच.एच. ६४८३ क्रमांकाचा ट्रक चालकाला हात देऊन थांबवलं. यावेळी प्रवाशांच्या ट्रॅव्हल्स बस ट्रकला पाठीमागून धडकली आणि अपघात झाला. उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून तर २३ गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये चार महिन्यांचा बाळाचा देखील समावेश आहे. यावेळी हडस पिंपळगाव टोलनाक्याचे पुढे जात असताना त्यांचे ८० किमी लेनच्या समोर १२० वेग मर्यादेच्या लेन मध्ये ट्रक सुध्दा वेगात जात होता. परंतु त्याला समोरील उभ्या असलेल्या आर.टी.ओ.च्या वाहनातील अधिकाऱ्यांनी हात दाखवून थांबण्याचा इशार दिला. त्यामुळे ट्रक चालकांने ट्रक हा ८० किमी असलेल्या लेनमध्ये अचानकपणे भरधाव वेगात घेतला. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर गाडी ही जोरात ट्रकला पाठीमागून धडकली. तक्रारीवरून पोलीस ठाणे वैजापुर येथे भादंवी कलम ३०४(२), ३०८, ३३७, ३३८,३४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक ड्रायव्हर ब्रिजेशकुमार कमलसिंग चंदेल (३२, रा. सलैय्या, शिवपुरी, मध्यप्रदेश) यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे २ अधिकारी असे तिघांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार सतिष वाघ, पोलीस निरीक्षक, स्थागुशा हे करत आहे. दरम्यान या प्रकरणी परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी मीटिंग बोलवून दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BEXAoak
No comments:
Post a Comment