Breaking

Monday, October 16, 2023

मध्यरात्री गर्लफ्रेण्डला भेटायला गेला, सकाळी थेट मृतदेह आढळला, तरुणासोबत नेमकं काय घडलं? https://ift.tt/drfo8eI

कैमूर: प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्यानंतर प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आलं. बिहारमधील कैमूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले. तर प्रेयसीचे कुटुंबीय फरार झाले आहेत. प्रेमप्रकरणाचे हे प्रकरण भभुआ पोलिस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर गावातील आहे.भभुआ पोलिस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर गावातील रहिवासी किशून बिंद यांचा २१ वर्षीय मुलगा राजा बाबू मध्यरात्री आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. किशून बिंद यांनी सांगितले की, मुलीने रात्री मुलाला तिच्या घरी बोलावले होते. याबाबत घरच्यांना कोणतीही माहिती नव्हती. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुलीची आई त्यांच्या घरी आली आणि तुझा मुलगा माझ्या घरी आल्याचे सांगितले आणि मला पाहताच तो घरातून पळून गेला, इतकं बोलून ती निघून गेली. त्यानंतर त्यांनी मुलाचा बराच शोध घेतला मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह कलौंज गावालगतच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी मुलाची हत्या करून मृतदेह लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. गावकरी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, दोघांचे प्रेमसंबंध होते. रात्री फोन केला असता मुलगा मुलीच्या घरी गेला होता. सकाळी बराच शोध घेतल्यानंतर कालौंज येथील सिवानमध्ये एका झाडाला लटकलेला मृतदेह आढळून आला. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे.दरम्यान, भभुआ पोलिस स्टेशनचे प्रभारी राम कल्याण यादव यांनी सांगितले की, कलौंज गावातील सिवानमध्ये एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेला असल्याची माहिती मिळाली होती. तरुणाच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली असता त्यांनी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली. तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी केली जात आहे. घरातील सदस्य फरार आहेत.प्रियकर आणि प्रेयसी दोघेही एकाच गावातील रहिवासी होते. दोघांचीही जातही एकच होती. पण, मुलीच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. मुलगा मुलीला भेटण्यासाठी मध्यरात्री तिच्या घरी पोहोचला तेव्हा मुलीच्या घरच्यांना ते दिसले. आता मुलाचे कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dE3Nxkp

No comments:

Post a Comment