Breaking

Wednesday, November 22, 2023

जितेश शर्मा आणि इशान किशनमध्ये संघात कुणाला संधी? सुर्यकुमार यादवने उत्तर दिले, वाचा नेमकं काय म्हणाला? https://ift.tt/3b2rxp4

विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या हृदयद्रावक पराभवानंतर अवघ्या चार दिवसांनी भारत २३ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याच संघाचे यजमानपद भूषवणार आहे. यावर आता भारताचा नवनियुक्त टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितले की, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.दरम्यान आता जितेश शर्मा आणि इशान किशन यांच्यापैकी कोणाला संघात यष्टिरक्षक म्हणून नियुक्त केले जाईल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे सूर्यकुमार यादवने उत्तर दिले आहे. इशान चांगली कामगिरी करत आहे, आम्हाला सातत्य राखायचे आहे. आशिया चषक आणि विश्वचषकासह वेगवेगळ्या स्थानावर फलंदाजी करत त्याने आमच्यासाठी खरोखर चांगली कामगिरी केली आहे. हे दोघेही आघाडीचे खेळाडू आहेत. आम्ही आज संवाद साधू," सूर्या हसत म्हणाला. पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, त्यांना गेल्या स्पर्धेपासून जितेशसोबत सातत्य राखायचे आहे. तसेस इशान किशनही खेळण्याची संधी देण्यास पात्र आहे. संघात खेळण्याबाबत विझागमधील सामन्याच्या आदल्या रात्री निर्णय घेतला जाईल, असे यादव म्हणाला. आयपीएल २०२३ सीझनमध्ये जितेशची कामगिरी काही कमी प्रभावी नव्हती. त्याने १४ सामने खेळले आणि १५६.०६ च्या स्ट्राइक रेटने एकूण ३०९ धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याने २२ चौकार आणि २१ षटकार मारले होते. अर्धशतक न गाठताही त्याची सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद ४९ धावा ठरली होती. शर्माच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला मधल्या फळीतील विश्वसनीय फलंदाज आणि संघासाठी नियुक्त फिनिशर म्हणून त्याचे स्थान निश्चित करण्यात मदत झाली. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sDfpogY

No comments:

Post a Comment