मुंबई : मोहम्मद शमी हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कारण या सामन्यात शमीने सात विकट्स मिळवल्या आणि न्यूझीलंडने त्याच्यापुढे लोटांगण घातले. पण या विजयानंतर शमीने या विजयाचे रहस्य सांगितले आहे.मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तेव्हा शमीने या विजयाचे रहस्य सांगितले. शमी म्हणाला की, " मी वर्ल्ड कपपूर्वी वनडे क्रिकेट फार कमी खेळलो होतो. मी माझ्या संधीची वाट पाहत होतो. न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाला येथे माझे पुनरागमन सुरू झाले. आपण नेहमीच गोलंदाजीच्या वैविध्याबाबत बोलत असतो, परंतु तरीही माझा विश्वास आहे की नवीन चेंडूने विकेट मिळवणे हे महत्वाचे असते. मी विल्यमसनचा झेल सोडला. त्यावेळी मी घाबरलो होतो. मला फार वाईट वाटत होते. पण मी घाबरलो असले तरी मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले. खेळपट्टी ही फलंदाजासाठी चांगली होती. कारण दुपारी चांगल्या धावा निघत होत्या. संध्याकाळी दव पडल्यामुळे फलंदाजीसाठी पोषक वातावरण होते. या परिस्थितीत विकेट्स मिळवण्याची एक वेगळी कला असते. खेळाडूंना फटके मारण्यासाठी पुढे आणून विकेट्स मिळवायची असते, हीच गोष्ट मी या सामन्यात केली. त्यामुळे मला यश मिळाले. गेल्या दोन्ही सेमी फायनलमध्ये आम्ही पराभूत झालो होते. त्यामुळे यावेळी सर्व काही सर्वस्व पणाला आम्ही लावले होते. जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे संघाने शेवटपर्यंत हा सामना सोडला नाही आणि त्यामुळेच आम्ही फायनलमध्ये पोहोचू शकलो." शमी या विजयाचा खरा नायक ठरला. कारण खेळपट्टी ही फलंदाजीसाठी कुरण होती. त्यांना मोठे फटके सहज मारता येऊ शकत होते. पण या खेळपट्टीवर शमीने जी गोलंदाजी केली त्याला तोड नव्हती. भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी आता शमीच्या नावावर नोंदवली गेली आहे. शमीने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली. कारण शमीची ही कामगिरी कधीही कोणीच विसरू शकणार नाही. कारण शमीने एकहाती भारताला विजय मिळवून दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/orepLdt
No comments:
Post a Comment