मुंबई: अनोळखी महिलांकडून मैत्री करत तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मुंबईतील कफ परेड येथील नौदल सुभेदाराला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळण्यात आले. तसेच घाटकोपरमधील तरुणालाही फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करत बदनामीची धमकी देत एक लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. ही दोन्ही प्रकरणं सायबर सेक्सटॉर्शनची आहेत. तसेच फक्त सामान्य व्यक्तीच नाहीतर मोठे मोठे अधिकारीही सेक्सटॉर्शन प्रकरणात अडकत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी सेक्सटॉर्शनचे ४६ गुन्हे दाखल केले आहेत. नौदल अधिकाऱ्याला सीबीआय अधिकाऱ्याची धमकीकफ परेड परिसरात राहणाऱ्या एका नौदल अधिकाऱ्या पूजा शर्मा नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. या अधिकाऱ्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर थोड्यावेळात त्यांना व्हिडिओ कॉल आला. अधिकाऱ्याने कॉल घेताच समोरील महिलेने अंगावरील कपडे काढले. यानंतर अधिकाऱ्याने तात्काळ कॉल बंद केला. मात्र, यानंतर त्या अधिकाऱ्याला एका महिलेसोबत नग्न अवस्थेत दाखवण्यात आल्याचा व्हिडिओ निदर्शनास आला. हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत तरुणीने अधिकाऱ्याकडून पाच हजार रुपये घेतले. काही दिवसांनी एका व्यक्तीने या अधिकाऱ्याला फोन करत सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले आणि कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून अडीच लाख रुपये उकळले फेसबुकवरील मुलीशी मैत्री पडली महागातघाटकोपरचा राहिवाशी असेलल्या एका तरुणाला हर्षिता शर्मा नावाच्या महिलेने फेसबुकवर मैत्री केली. हाय- हॅलो बोलणे झाल्यानंतर महिलेने तरुणाला कॉल केला आणि त्याला नग्न होण्यास भाग पाडले. याचा महलेने व्हिडिओ रेकॉर्ड करुन तरुणाच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. तरुण बदनामीला घाबरल्याने त्याने महिलेला १ लाख तीस हजार रुपये दिले. मात्र, यानंतरही महिलेने पैसे मागणे चालूच ठेवल्याने तरुणाने पोलिसांत धाव घेतली. सेक्सटॉर्शनमधून वाचण्यासाठी काय करावे
- अनोळखी महिलांद्वारे आलेले फोन कॉल टाळावेत
- नग्न कॉल पाहताच कॉल कट करुन तो नंबर ब्लॉक करावा
- व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणाऱ्यांची पोलिसात तक्रार करावी
- सोशल मिडियावर अनोळखी महिलांशी मैत्री करताना सावधानी बाळगावी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kdgBGJo
No comments:
Post a Comment