Breaking

Wednesday, November 29, 2023

अवकाळीनंतर आता नवे संकट, विमा कंपन्या 'नॉट रिचेबल', शेतकऱ्यांची चिंता वाढली https://ift.tt/d0AOgIN

म. टा. वृत्तसेवा, वर्धा: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांना विम्याचा लाभ मिळतो. यासाठी ७२ तासांत नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. वेळेत आपली सूचना मिळावी म्हणून शेतकरी दोन दिवसांपासून कंपनीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करीत आहेत. या नंबरवर संपर्कच होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पीक विमा कंपनीच्या काही प्रतिनिधींकडून टाळटाळ केली जात असल्याचा आरोपही होत असल्याने गावांमध्ये संताप आहे.वर्धा जिल्ह्याचा विचार करता ५८ हजार ७१ हेक्टरवर तुरीची; तर दोन लाख १९ हजार ३२ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. पीक काढणीच्या हंगामातच अवकाळी पाऊस झाला. राज्यात एक लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश नेत्यांकडून दिले जात आहेत. वास्तवातील परिस्थिती वेगळी आहे.नेमके काय घडतेय?- विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोनची रिंगच जात नाही.- कुणाचा फोन लागला तर उचलला जात नाही.- चूकून उचलला गेला तर योग्य उत्तर मिळत नाही.नियम काय सांगतो?शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत संबंधित पीक विमा कंपनीला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. या सूचनेनंतर संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी करणार; पण फोनच लागत नसताना ही प्रक्रिया पूर्ण कशी होणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत. एक रुपयांत पीक विमा दिल्याचा गाजावाजा करणाऱ्या सरकारने ही परिस्थिती सुधारण्याची मागणीही शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला. पीक विमा कंपनीला सरकारने कोट्यवधी रुपये दिले. आता संबंधित कंपनीचा फोन लागत नाही. ७२ तास लोटल्यावर कंपनी ऐकणार नाही. काय करावे हे कळेनासे झाले आहे.- पंकज काचोळे, म्हसळा, जि. वर्धाशेतकऱ्यांना मदतीसाठी आवाज उठवूबुलढाणा : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे दहा-वीस टक्के नव्हे तर शंभर टक्के नुकसान झाले आहे. केवळ पीक नव्हे तर शेडनेट, सिंचन साहित्याचेही मोठे नुकसान आहे. सरकारची मदत ही पिकांच्या संदर्भामध्ये मिळेल; पण इतर पूरक साहित्याचे काय हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आवाज उठवू, अशी ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. दानवे यांनी मंगळवारी सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर, गोळेगाव, पळसखेड चक्का भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.Read And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TnMPyOs

No comments:

Post a Comment