कल्याण : ठाणे, नवी मुंबई येथून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शिळफाटा मार्गावर बुधवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण ते एक तास लागत होता. त्यामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले आहेत. याबाबत नागरिकांनी सांगितले की, कल्याण - शिळ रोडवर अवजडं वाहनांना बंदी घालवी, तसेच रखडलेल्या पलवा पुलाचे काम लवकरात लवकर करावे. दरम्यान, याच विषयावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर एक्स (ट्विटर ) माध्यमातून टीका केली आहे. कल्याण शिळ रोड ट्रॅफिकचा विषय हा काही नविन नाही. मात्र, अद्याप यावर ठोस उपाय अद्याप प्रशासन यांच्याकडून करण्यात आले नाहीत. त्यामुळेच प्रवाशांना नाहक त्रास होत आहेत. असाच त्रास बुधवारी रात्री पुन्हा झाला. त्यामुळेच मनसे आमदार पाटील यांनी एक्स पोस्ट करत मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार यांच्यावर टीका करत आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ मुख्यमंत्री द्यावा अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले मनसे आमदार...
शीळफाट्याच्या वाहतुककोंडीने स्वतःचेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत, वाहतुककोंडी सुटावी यासाठी रोज नव्यानव्या ‘स्किम’ घेऊन येतात, त्या स्किम नसतातच,पॅाकेटमनीसाठी केलेला ‘स्कॅम’ असतो अश्या चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत. गरोदर बायका, वृध्द, रूग्ण सगळे तासनतास ट्रॅफिकला सामोरे जातायत तेही आपल्या सुपुत्राच्या मतदारसंघात? महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या? कधीतरी आमच्या सुचनांचा विचार करा, कदाचीत वाहतुक कोंडी कमी होईल! पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण एकदा आमच्या सुचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शिळफाट्याच्या ट्रॅफिक जामचा शिक्का तेवढा पुसा.दरम्यान कल्याण - शिळ रोडवर ट्रॅफिक विषय मार्गी लावण्यासाठी मनसे आमदार वारंवर विषय मांडत असतात आणि रस्त्यावरही उतरत असतात त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष याकडे लक्ष देणार का हे पहावे लागेलfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/asBYM8l
No comments:
Post a Comment