कोल्हापूर: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार यामुळे एकाचा तीळपापड होत आहे. आज तो आमच्या कोपऱ्यात आला होता आणि खोकत होता म्हणे मात्र त्यांच्यावर आज मी जास्ती काही बोलणार नाही. मात्र, आपल्या टप्प्यात आला की आपण दणका देतोच. मंत्री छगन भुजबळ मराठा आणि ओबीसी समाजात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांचं बोलण बंद करावं. अन्यथा आम्हाला देखील नाही नाईलाज होईल असे म्हणत मराठा आंदोलन पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कोल्हापुरात जंगी स्वागत :मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्यावर असून त्याच कोल्हापुरात आले होते. यावेळी अनेक ठिकाणी त्यांचे मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आलं. जयसिंगपूर येथे गजराज (हत्तीने) मनोज जरांगे पाटील यांना हार घातले तर अनेक ठिकाणी जेसीबी लावून त्यातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान रात्री आठच्या सुमारास जरांगे पाटील हे कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात कार्यक्रम स्थळी दाखल झाले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती देखील उपस्थित होते. दरम्यान, भाषणाला सुरू करण्याआधी जरांगे पाटील यांनी छत्रपती घराण्याला सन्मान देत संभाजीराजे छत्रपती यांना देखील व्यासपीठावर येण्याची विनंती केली. तर संभाजी राजे यांनी देखील मनोज चरांगे पाटील यांच्या विनंतीला मान ठेवत व्यासपीठावर दाखल झाले. तर मोठ्या संख्येने शहरासह तालुक्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांचं बोलणं बंद करावं: तर मनोज जरांगे पाटील यांनी सभेला संबोधित करताना ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला, आज जालना अंबड येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजावर तीव्र शब्दात टीका केली होती याला जरांगे पाटील यांनी उत्तर देताना नोंदी नसल्याचे सांगत गेल्या 70 वर्षापासून देण्यात आले नाही आणि आता नोंदी मिळत आहेत. प्रत्येक वेळेस येणारी समिती ही या नोंदी लपवून ठेवत होती म्हणजेच त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता आणि तो दबाव कोणी टाकत होता हे पाहिले पाहिजे. आज लाखो नोंदी सापडत आहेत आणि मराठा लेकरांच्या पदरात आरक्षणाचे दान पडत आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार हे आता सर्वांना माहीत झाला आहे. यामुळे काही जणांनाच तीळपापड होत आहे. छगन भुजबळ यांच्या बद्दल एक व्यक्ती म्हणून माझ्या मनात इज्जत होती मात्र आज त्यांनी ओबीसी एल्गार सभेत पातळी सोडली एका समाजाचा प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी काय बोलावं हे समजायला हवं. तुम्ही आमचं जीवन काढलात मात्र आम्हाला तुमच्यासोबत माहित आहे. तुम्ही मुंबईमध्ये काय करत होता. आम्ही घाम गाळून आमचं पोट भरलं मात्र तुम्ही मराठा समाजाला गोचीड सारखं चिटकला आणि रक्त पिला. म्हणून तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं अशी टीका जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केली आहे. मंत्री भुजबळ आता मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं बघत आहेत :भुजबळ आधी म्हणाले मी त्यांच्या एकट्याच्या मागे लागलो आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलणं बंद केलं. मात्र त्यांनी 2- 4 दिवसांनी पुन्हा उकरून विषय काढले म्हणून परत मी बोलयलो. सरकार ने त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ना विनंती आहे भुजबळ ओबीसी आणि मराठा समाजात जातीय तेढ निर्माण करत आहे. यापुढे ही आम्हाला शांततेत आंदोलन करायचं आहे. यामुळे सरकार ने त्यांच बोलायच बंद कराव नाहीतर आम्हाला नाइलाज होईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मंत्री भुजबळ आता वेगळं स्वप्नं बघत आहेत, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि म्हणून अजित दादांना पुढे पाठवत आहेत असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आहे मात्र एक डिसेंबर पासून गावागावात सकाळी उपोषणाला सुरुवात करा असा आदेशच जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kntPXOY
No comments:
Post a Comment