वृत्तसंस्था, चंडीगडभटक्या कुत्र्यांची दहशत व उपद्रवाची दखल घेत पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने याबाबत थेट राज्य सरकारवर जबाबदारी निश्चित केली आहे. कुत्र्याच्या प्रत्येक चाव्याबद्दल राज्य सरकारने १० हजार रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयासमोर भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत १९३ याचिका दाखल झाल्या होत्या. याबाबत अनेक याचिकांमध्ये पीडितांकडून नुकसान भरपाईचीही मागणी करण्यात आली होती. या तक्रारींची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती विनोद भारद्वाज यांच्या पीठाने भटके कुत्रेच नव्हे, तर भटके, जंगली, पाळीव व सोडून दिलेल्या सर्वच जनावरांच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारवर निश्चित केली. यासोबतच भटक्या जनावरांविषयीच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी व निवारणासाठी पोलिसांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही निश्चित केली.'भटक्या जनावरांनी हल्ला केल्याची तक्रार येताच पोलिस ठाण्याच्या प्रमुखाने विनाविलंब पोलिस डायरीत त्याची नोंद करावी. या तक्रारींची शहानिशा करावी. साक्षीदारांचे म्हणणे नोंदवावे व घटनास्थळाचा आराखडा मांडावा. या सर्व नोंदींची प्रत तक्रारकर्त्याला द्यावी', असे न्यायालयाने म्हटले आहे. 'याबाबत पंजाब व हरयाणा राज्यांच्या पोलिस महासंचालकांनी सूचनापत्र प्रसृत करावे. जिल्हा उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून जनावरांच्या उपद्रवाबाबत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करावी. केवळ कुत्रेच नव्हे, तर गायी, बैल, नीलगाय, म्हशी, माकडे आदींचाही यामध्ये समावेश करावा. या समितीने भरपाईसाठी अर्ज केल्यापासून चार महिन्यांमध्ये त्यास मंजुरी द्यावी', असा आदेशही न्यायालयाने पंजाब, हरयाणा तसेच चंडीगडच्या प्रशासनाला दिला............जशी जखम, तशी भरपाईविशेषत: कुत्र्याच्या चाव्याबद्दल न्यायालयाने संबंधित नागरिकाला १० हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. कुत्र्यांनी लचका तोडून जखम केली असल्यास प्रति २ मिलीमीटरच्या जखमेसाठी २० हजार रुपये भरपाई द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VsbMHhv
No comments:
Post a Comment