वृत्तसंस्था, नवी दिल्लीदिवाळीत विविध कंपन्यांच्या जाहिरातींच्या भडिमारात सोन्याचांदीच्या आवर्जून दिसतात. त्यात अनेकदा चित्रपटसृष्टीतील कलाकारांना प्राधान्य दिले जाते. मात्र या सेलिब्रिटींनीही त्यांचे पैसे वाढवल्याने आणि त्यांच्या अटी-शर्तीही जरा जाचक केल्याने या नामांकित ज्वेलरी ब्रँड्सची डोकेदुखी वाढली आहे. काही मोठमोठे स्टार तर एका दिवसासाठी तब्बल आठ कोटी रुपये घेत आहेत.इकॉनॉमिक टाइम्सने अशा काही नामांकित ज्वेलरी कंपन्यांशी संपर्क साधून या संदर्भात आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका ज्वेलरी ब्रँडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या स्टारच्या मागण्या प्रचंड वाढल्याची तक्रार केली. तसेच इतकी मोठी रक्कम देऊनही हे स्टार त्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी वर्षातून तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस देण्यासही तयार नसतात. काही जण तर दिवसभराच्या शूटिंगदरम्यान दिवसातून दोनवेळा कपडे बदलण्यासही नकार देतात. शिवाय, ते दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त काम काम करण्यासही तयार नसतात. गंमत म्हणजे त्यात वाहतूककोंडीतील वेळही धरलेला असतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले.‘पुष्पा’चा भाव वधारलादाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात, घराघरांत पोहोचल्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. अल्लू अर्जुन काही वर्षांपूर्वी ३५ लाख रुपये आकारत असे. पुष्पाच्या उदंड यशानंतर तो आता सहा कोटी रुपये दर लावतो. माधुरी दीक्षित आठ तासांसाठी एक कोटी रुपये घेते. तर, किआरा अडवाणी प्रत्येक दिवसासाठी फोटोशूट, दुकानांचे उद्घाटन आणि ब्रँडशी संबंधित कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी दर दिवसाला दीड ते दोन कोटी रुपये घेते.काजोलला मिळेना पर्याय‘गेल्या आठ वर्षांपासून काजोल आमच्या ज्वेलरी ब्रँडची ब्रँड ऍम्बेसेडर आहे. आम्ही आता नव्या चेहऱ्याच्या शोधात आहोत. मात्र प्रत्येक ज्वेलरने कोणत्या ना कोणत्या चेहऱ्याला घेतले आहे,’ असे जॉयलुकासच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख अनिश वर्गीझ यांनी सांगितले. दाक्षिणात्य स्टारने वाढवली आठपट किंमतदाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्यांच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशा प्रकारच्या ब्रँडच्या करारासाठी त्यांच्या फीमध्ये २०२१च्या दराच्या तुलनेत आठपट वाढ केल्याचे सांगितले जाते. मलाबार गोल्ड आणि डायमंड यांनी यंदा आलिया भट्ट, ज्युनिअर एनटीआर, अनिल कपूर, करीना कपूर खान आणि तमिळमध्ये लोकप्रिय असलेला कार्तिक शिवकुमार यांना करारबद्ध केले आहे. आलिया भट्ट त्यांच्याशी पहिल्यांदाच जोडली गेली आहे. तर, ज्युनिअर एनटीआरसोबत कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मिया बाय तनिष्कने अभिनेत्री रकुल प्रीतला करारबद्ध केले आहे. तर, झोया ज्वेलर्सने सोनम कपूर अहुजाला करारबद्ध केले आहे. तनिष्कने नवीन ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्याशी करार केला आहे. तिने यासाठी तब्बल पाच कोटी रुपये किंमत आकारल्याचे सांगितले जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WYlRLf6
No comments:
Post a Comment