Breaking

Wednesday, November 8, 2023

पुण्याच्या बीटी कवडे रोड गोळीबार; एक जण गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण https://ift.tt/qXjcmM6

पुणे: पुण्यातील वर्दळीच्या ठिकाण मानले जाणाऱ्या बी टेकवडे रोड येथे गोळीबार झाल्याची घटना आज ९:२० च्या दरम्यान घडली आहे. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तो सराफ व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे. सराफ व्यावसायिक आणि त्याचे वडील घरी निघाले असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले सोनं आणि रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. घटनास्थळी वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस हजर झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल (३५) असे या गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला आहे. त्याच्यासोबत त्याचे वडील देखील होते मिळालेल्या माहितीनुसार, क्रोम मॉल चौकापासून बी.टी.कवडे रोड कडे जाणा-या रस्त्यावर सराफ व्यवसायिक आपल्या घरी निघाले होते. त्याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये प्रतीक मदनलाल ओसवाल एक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या मांडीवर आणि तोंडाला गोळी लागल्याचे माहिती समोर येत आहे. चोरटे त्यांच्याकडे असलेले सोने हे घेऊन फरार झाले आहेत. अशी माहिती जखमी झालेले प्रतीक ओसवालचे वडील देत आहे. ऐन दिवाळीच्या सणावर भर रस्त्यात गोळीबारचा प्रकार घडल्यामुळे परिसरात मोठं भीतीचे वातावरण पसरलं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pa9LkDe

No comments:

Post a Comment