ठाणे : ठाण्यासह कल्याण - डोंबिवली, अंबरनाथमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवघ्या काही तासांच्या पावसात ठाण्यातील काही सखल भागात पाणी साचले. तर वीजपुरवठा खंडीत झाला. तसेच रस्त्यावर दिवाळी निमित्ताने वस्तूंची विक्री करणार्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.ठाण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी नऊ वाजता धुवाँधार पावसाला सुरवात झाली. या पावसाने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांचा वेग मंदावला. या पावसाचा फटका व्यापारीवर्गाला मोठ्या प्रमाणात बसल्याने त्यांच्या मालाचेही नुकसान झाले. तसेच ऐन दिवाळीत वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरातील काही भागात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक चांगलेच सुखावले असून हवेत गारवा निर्माण झाला. कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांकडे छत्री, रेनकोट नसल्याने ठिकठिकाणी दुकानांच्या कडेला आडोसा घेतला होता.कल्याणात वीज पुरवठा खंडीतकल्याण डोंबिवलीत गडगडाटासह विजांचा लखलखाट सुरू झाला. काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हा खेळ सुरू होता. भात पिकाचेही नुकसानऐन वसू बारशीच्या संध्याकाळी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने अंबरनाथ, बदलापूर परिसराला झोडपून काढले. ग्रामीण भागात कापणीला आलेल्या भात पिकाचेही नुकसान झाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3RFaoc9
No comments:
Post a Comment