Breaking

Monday, November 27, 2023

बेभरवशी पावसामुळे उत्पादनात तूट, तूरडाळ आणखी महागणार; अवकाळीमुळे भाजीपालाही कडाडला, सर्वसामान्यांचे हाल https://ift.tt/xuRUmTN

मुंबई: तूरडाळीच्या उत्पादनात यंदा जवळपास २५ टक्क्यांची तूट आहे. त्यामुळे परिणामी सध्या १८० ते २०० रुपये किलोदरम्यान असलेल्या तूरडाळीचे भाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.भारतात तुरीचे पीक केवळ खरिप हंगामात घेतले जाते. या पिकात ९.३२ टक्क्यांची तूट होतीच, मात्र अनियमित पावसामुळे पीक मोठ्या प्रमाणावर खराब होऊन प्रत्यक्ष उत्पादनात मोठ्या तुटीची चिन्हे आहेत. दुसरीकडे, कांदा किरकोळ बाजारात ८० रुपये व टोमॅटो ६० रुपये प्रति किलोवर गेला असून शंभरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शिवाय सर्वच भाज्या किमान ८० रुपये किलो झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भारत हा डाळींचे सर्वाधिक सेवन करणारा देश आहे. त्यामध्ये तूरडाळ अग्रस्थानी असते. दर वर्षी ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीची मागणी देशात असते. केंद्रीय सांख्यिकी संचालनालयाकडील आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात ४२.२० लाख टन तूर उत्पादन घेण्यात आले होते. २०२२-२३चे लक्ष्य ४५.५० लाख टन असताना प्रत्यक्षात फक्त ३३.१२ लाख टन इतकेच उत्पादन झाले आहे. आता यंदा ४३ लाख टन उत्पदनाचे लक्ष्य निश्चित आहे. मात्र, एकंदर स्थिती पाहता जेमतेम ३४.१२ लाख टन तूरडाळ उत्पादित होण्याची चिन्हे आहेत. डाळीचे हे नवीन पीक आता बाजारात येऊ लागले आहे.भारतात तूरडाळीचे हेक्टरी उत्पादन ८८० किलो इतके आहे. तुरीपासून सर्वोत्तम डाळ ही साधारण ३० टक्के, मध्यम दर्जाची ३० टक्के, तर निम्न दर्जाची २० ते ३० टक्के असते. जवळपास १८ ते २० टक्के तूर ही डाळ प्रक्रियेत वाया जाते. यानुसार यंदा तूरडाळीची मागणी व पुरवठा यांच्यातील तफावत नऊ लाख टनाच्या घरात जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.मूगडाळीचाही दिलासा नाहीचतूर महागली की अनेक जण मूगडाळ सेवनाकडे वळतात. मात्र, यंदा मूगडाळीच्या उत्पादनात मागील वर्षी २० व यंदाच्या लक्ष्याच्या तुलनेत ४० टक्क्यांची मोठी तूट आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदा खरिपात २०.२० लाख टन मूगडाळ उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले होते. त्या तुलनेत अधिकाधिक १४.०५ लाख टन मूगडाळ बाजारात येत आहे. हा आकडा मागील वर्षीच्या १७.१८ लाख टनापेक्षा कमी आहे. त्यामुळे तूरडाळीऐवजी मूगडाळीचे सेवन करायचे असल्यास तीही महागण्याची चिन्हे आहेत. महत्त्वाच्या धान्यांची खरिपातील स्थितीधान्य प्रकार गेल्या वर्षी यंदाचे लक्ष्य प्रत्यक्षाततांदूळ ११०५.१२ १११० १०६३.१३ज्वारी १४.८० १९.१० १६.४४बाजरी १०३.४९ ९९.३० ९४.३६एकूण भरड १३९.०४ १४०.४० १२६.५५तूर ३३.१२ ४३ ३४.२१उडीद १७.६८ १९.७० १५.०५मूग १७.१८ २०.२० १४.०५एकूण १५५७.११ १५८१.३० १४८५.६९(स्रोत : केंद्रीय कृषी मंत्रालय)(आकडे लाख टनांत)भाज्यांसह फळांचे मोठे नुकसाननवी मुंबई : अवकाळी पावसाने रविवारी मुंबई-ठाण्यासह रायगड, नाशिक, पुण्यातही हजेरी लावली. त्यामुळे भाज्यांच्या मळ्यात हातातोंडाशी आलेला भाजीपाला भिजून गेला आहे. फळांच्या बागाही पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे नुकतेच नियंत्रणात आलेले भाज्या आणि फळांचे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. हापूस आंब्याला आलेला मोहर गळून पडल्याने फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. Read And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BiPtW3A

No comments:

Post a Comment