नाशिक: मखमलाबाद परिसरातील राहत्या बंगल्यात एका मुख्याध्यापिकेने गळफास घेत आत्महत्या केली. (५४, रा. मखमलाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. बागूल या इगतपुरी येथील एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. या घटनेप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागूल यांचा वाहनचालक सोमवारी (दि. २७) सकाळी त्यांच्या घरी आला. तेव्हा बागूल या बंगल्याचा दरवाजा खोलत नसल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून बघितले. तेव्हा बागूल यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून म्हसरूळ पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. दरम्यान, बागूल या बंगल्यात एकट्याच राहत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/h4ldpkW
No comments:
Post a Comment